Bride / Groom Form

पळसगाव जाट येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात संपन्न

09 December 2024 sant santaji maharaj jagnade 132 views

     पळसगाव जाट :-  दिनांक आठ डिसेंबर 2024 रोज रविवारला पळसगाव जाट येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव संपूर्ण  गावाकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी  जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण पळसगाव जाट चे सरपंच जगदीश कामडी, पोलीस पाटील सुभाष कोलते, माजी सरपंच निरंदासजी पाकमोडे, रवी कायरकर,निशांत लोणकर, रामभाऊ गिरडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

sant santaji jagnade maharaj jayanti celebration in Palasgaon Jat - Chandrapur     संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त गावात शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण तेल घाणा,महिलांची दिंडी, पुरुषांचे भजन मंडळ, बँड पथक आणि महिलांचे  लेझीम पथक तसेच लहान बालकांनी संताजी आणि थोर पुरुषांच्या वेशभूषा केलेल्या होत्या. त्यामुळे या शोभायात्रेने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

     संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती उत्सवाला पळसगाव जाट व डोंगरगाव येथील तेली समाजाचे सर्व समाज बांधव यांचे सहकार्य लाभले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Delhi Sahu Rathore samaj yuvak yuvati parichay sammelan & pratibha samman samaroh