Bride / Groom Form

धाराशिव तेली समाजाच्‍या वतीने श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्‍साहात संपन्‍न

09 December 2024 sant santaji maharaj jagnade 101 views

संताजींचे विचार लहान थोरांपर्यंत पोहचले पाहिजेत- माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील

     धाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेच्या वतीने धाराशिव शहरातील जनता बँकेच्या समोरील संताजी जगनाडे महाराज चौकात राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त प्रतिमेला हार पुष्प अर्पण करून धाराशिव माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील व जनता बँकेचे माजी चेअरमन मा.श्री विश्वास आप्पा शिंदे आनंद नगर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक घाडगे साहेब,धाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांच्या हस्ते पुजन करून अभिवादन केले.

sant santaji jagnade maharaj jayanti celebrat by Dharashiv - Osmanabad Teli Samaj

     नवीन पिढीला चांगल्या संस्कारांची गरज आहे.संताजींचे विचार त्यांची पुस्तके वाचण्यासाठी आवड निर्माण केली पाहिजे.यासाठी समाजाने पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन नानासाहेब पाटील यांनी केले.संत तुकाराम महाराजांच्या एक टाळकर्यापैकी एक टाळकरी संताजी जगनाडे महाराज होते.त्यांची बुध्दी अत्यंत चानाक्य होती.संताजी महाराज यांच्या स्मरणशक्ती व बुध्दीमत्तेच्या जोरावर त्यांनी तुकाराम महाराजांचे अभंग मुखोदमुख केले होते.आज आपल्या समोर तुकाराम महाराज यांची गाथा फक्त संत संताजी जगनाडे यांच्या लिखाणामुळे आहे.संताजींचे विचार लहान थोरांपर्यंत पोहचले पाहिजेत असे प्रतिपादन नानासाहेब पाटील यांनी केले.

sant santaji jagnade maharaj jayanti celebraation in Osmanabad

     कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय बंडगर, राजाभाऊ घोडके, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भारत डोलारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर,नगरसेवक खलिल सर,सिध्देश्वर कोळी,बापु पवार,अँड खंडेराव चौरे,मसुद भाई शेख,श्रीकांत साखरे, कोषाध्यक्ष महादेव मेंगले, धाराशिव तालुका अध्यक्ष दत्तात्रय बेगमपुरे, लक्ष्मण माने, आबासाहेब खोत,प्राचार्य डॉ अनिल देशमाने, सुनिल शेरखाने,प्रभाकर लोंढे, मिलिंद चांडगे, अँड गणपती कांबळे,चंद्रकांत मेंगले,शिवलिंग होनखांबे, सतिश लोंढे,देवानंद एडके,प्रविण घोडके,गणेश घोडके,दिपक नाईक, सचिन भोकरे,अमर कोरे,अतुल भांडेकर यांच्यासह समाज बांधव पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते‌.

sant santaji jagnade maharaj jayanti celebraation by Osmanabad Teli Samaj

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Osmanabad Teli Samaj gunavantha vidyarthi satkar