वधू - वर फॉर्म

संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे जयंती चिखली रोड अमडापूर येथे उत्‍साहात संपन्‍न

24 December 2024 sant santaji maharaj jagnade 192 views

     समस्त तेली समाजाच्या वतीने महादेव मंदिर चिखली रोड अमडापूर येथे संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीच्या वतीने समाज प्रबोधन व कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आलेला होता. या कार्यक्रमांमध्ये ह.भ. प. कैलास महाराज निर्मळ यांचे कीर्तनाचा कार्यक्रम झाला तसेच विद्याधर जी महाले साहेब यांचे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे खाजगी सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल समस्त तेली समाजाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यांनी संत संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले व श्री संत संताजी महाराज यांनी तुकाराम महाराजांचे अभंग व तुकाराम गाथा कशाप्रकारे पुनर्जीवित केल्या त्याविषयी मार्गदर्शन केले.

sant santaji jagnade maharaj 400 th jayanti celebration in Amaravati district      नवयुग गणेश मंडळ बाजारपुरा यांच्या वतीने चालवल्या जात असलेल्या संस्कार शिबिरातील लहान  विद्यार्थी कीर्तनामध्ये टाळकरी म्हणून उभे होते कार्यक्रमादरम्यान गं, भा ,  चंद्रभागाबाई श्रीराम पाखरे यांच्या स्मृती  प्रीत्यर्थ  संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांना श्रीमद्भागवत गीता ग्रंथ संतोष पाखरे यांच्या वतीने ह भ प कैलास महाराज यांच्या हस्ते  वितरित करण्यात आले व  महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Delhi Sahu Rathore samaj yuvak yuvati parichay sammelan & pratibha samman samaroh