वधू - वर फॉर्म

तेली समाज संघटाणी प्रत्येक गावात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करावी ..... प्रमोद पिपरे

24 December 2024 sant santaji maharaj jagnade 263 views

तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी व तेली समाज मेळावा व जेष्ठ नागरिक व गुणवंताचा सत्कार वैरागड  येथे पार पडला.  

     शनिवार दि. 21.12.2024 रोजी वैरागड येथे श्री. प्रमोदजी पिपरे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र प्रातिक तैलिक महासभा तथा उपाध्यक्ष संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोली,यांनी आपल्या मार्गदर्शनात असे म्हटले कि.महाराष्ट्रला अनेक थोर मोठ्या संत महात्म्याची  परंपरा लाभली आहे. संताजी आपल्या वाणीने,लेखणीने,कर्तुत्वाने वैदिक धर्माचे,गीता धर्माचे पूर्ण जीवन भर समाजाच्या लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला.यातील एक महान संत म्हणजे श्री.संताजी जगनाडे महाराज यांना संताजी महाराज म्हणूनही ओळखले जाते.संताजी महाराज हे तुकाराम महाराजाचे शिष्य होते.

sant santaji jagnade maharaj jayant to celebrat in All villages      संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज ८ डिसेम्बर १६२४ रोजी तेली समाजात झाला जन्म झाला त्यांचे मुळ गाव महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्यातल्या मावळ तालुक्यातील संदुबरे या गावी झाले. आज या ठिकाणी श्री. संत जगणाडे महाराजाची समाधी व स्मारक उभे केले आहे.

   संत तुकारामांनी लिहिलेल्या अभंगाची गाथा समाज कान्ठ्कानी इंदायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला.परंतु हे सर्व गाथा संताजी महाराजांना मुखादेन म्हणजे तोंड पाठ होती म्हणून तुकारामांनी लिहिलेली गाथा जशी होती तशी त्यांनी ते पुन्हा लिहून काढली.संत तुकाराम महाराजांची मुखातून लिहिणारे अभंग आपल्या लेखणीने टिपून घेत होते,संत तुकाराम महाराजाची गाथा जेव्हा इंद्रायणी नदीत समाज कंठकानी बुडवून दिले,तेव्हा संताजी महाराजांनी तेरा दिवसात ती अभंग गाथा जशीच्या तशी तुकारामाच्या स्वाधीन केली.अशा प्रकारे संत तुकाराम महाराजाच्या विचारांचे महान कार्य श्री.संत संताजी जगनाडे महाराजांनी केली.

      एवढ्या मोठ्या थोर संताची तेली समाजात आठवण व्हावी व त्यांच्या प्रेरणेतून आपल्या समाजाला खूप काही घेणे असल्याने व तेली समाजाला जागृत संस्कृत करण्याचे काम जयंती व पुण्यथिती च्या माध्यमातून गावागावातील तेली समाज संघटनाणी केली पाहिजे असे आव्हाहन श्री.प्रमोदजी पिपरे यांनी केले.

   यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. भाग्यवानजी खोब्रागडे, अध्यक्ष श्री. किसनरावजी खोब्रागडे एज्युकेशन आरमोरी हे होते. यावेळी प्रामुख्याने  मा. श्री. बबनरावजी फंड, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रा. ते. महासभा, सौ. योगिताताई पिपरे, माजी. नगरध्यक्ष न. प. गडचिरोली तथा उपाध्यक्ष विदर्भ महिला आघाडी महाराष्ट्र प्रा. ते. महासभा, श्री. प्रभाकरजी वासेकर, अध्यक्ष संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोली, श्री. उमेशचंद्र चिलबुले, अध्यक्ष महाराष्ट्र जी. प. कर्म. संघ मुंबई, श्री. परसरामजी टिकले, माजी. सभापती पंचायत समिती वडसा,श्री. रमेशजी लांजेवार, अध्यक्ष तेली समाज वैरागड, श्री. संदीपजी ठेंगरे, सचिव तेली समाज वैरागड, श्री. सुखदेवजी बोडणे उपाध्यक्ष तेली समाज वैरागड, श्री. सुरेशजी बावणकर सहसचिव तेली समाज वैरागड, सौ. रेखाताई बोधनकर, सौ. गायत्रीताई आकारे, सौ. उषाताई बोडणे, सौ. दिक्षाताई लांजेवार, सौ. संगीताताई मेहेर व सर्व तेली समाज युवक युवती बहुसंख्येने उपस्थित होते.

 

 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994