देहू येथील मंदिरात श्री तुकाराम महाराजांच्या श्री संताजी महाराजांचे हस्तलिखित वह्या असा फलक लावावा :- ज्ञानेशप्रसाद
पिंपरी चिंचवड : देहू येथे श्री संत संताजी महाराज जन्मोत्सव सोहळा शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर २०२४ रोजी मालेगाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मालेगावचे पोलीस पाटील काशिनाथ दादा काटेकर, श्री ज्ञानेशप्रसाद, जय संताजी अर्बन बँकेचे श्री बालाजी काजळे पुसद, पीएसआय हिंगे साहेब, सूर्यकांत चतुर बुलढाणा, अंबादासजी क्षीरसागर, विजय सरोदे, अशोक क्षीरसागर, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मायाताई वाघमारे वाशिम, असे मान्यवर या कार्यक्रमाला लाभले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलीस पाटील काशिनाथ काटेकर हे लाभले होते.
तद्वतच जगद्गुरु तुकोबारायांना एक बाब अजून खटकत आहे की मी ज्या संताजीला माझ्या मुलाप्रमाणे समजतो आणि ज्याने माझी गाथा लिहिल्यामुळे आज जगभर त्याची ख्याती झाली त्या गाथेचे लेखक असलेल्या माझ्या संताजीचे हस्ताक्षर म्हणून माझ्या मंदिर परिसरात लावलेला माझ्या नावाचा तो फलक काढावा आणि त्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे हस्ते लिखित वह्या असं न लिहिता श्री संताजी महाराजांच्या हस्तलिखित वह्या असे लिहावे तरच माझ्या मनाला शांती लाभेल! व माझ्या संताजी सह त्यांच्या वंशज असलेल्या तेली समाजाला देखील त्याचा अभिमान वाटेल असे रोखठोक प्रतिपादन ज्ञानेशप्रसाद यांनी यावेळी बोलताना केले. त्यानंतर अंबादासजी क्षीरसागर यांनी आज युवकांनी घेतलेल्या कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुक केले व असे कार्यक्रम दरवर्षी घेत राहावे असे आवाहन समाजातील युवकांना केले. तदनंतर बालाजी काजळे यांनी श्री संताजी अर्बन कॉपरेटिव च्या माध्यमातून जे कार्य आम्ही करत आहोत तसेच कार्य या ठिकाणी शाखा उघडून आपणही हातभार लावावा व समाज ऋण फेडावे तुम्हाला काय सहकार्य लागते ते मी करायला तयार आहे असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष शेटे, यांनी केले तर सूत्रसंचालन विनायक काटेकर व आभार प्रदर्शन निलेश सोनूने यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनता ग्रुपचे सर्व पदाधिकारी व समाजातील जेष्ठ मंडळींचे विशेष सहकार्य लाभले आहे, हर नारायण मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे शेवटी भोजनरुपी महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
