कन्नडमध्ये संत शिरोमनी संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात
संत जगनाडे महाराजांनी समाजाला भक्तीमार्ग दाखविला : संतोष कोल्हे
कन्नड : शहरातील लिंगेश्वर महादेव मंदिर येथे प. पू जगनाडे महाराज शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था व तिळवण तेली समाज बांधव कन्नड यांच्यावतीने श्री संत शिरोमनी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवारी साजरी करण्यात आली. संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सकाळी आठ वाजता शहरातील शनीमंदिर येथून लिंगेश्वर महादेव मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. तसेच उत्सव समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तेली समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी संताजी जगनाडे महाराजांच्या विचार प्रेरणेवर विचार व्यक्त केले. यावेळी माजी नगरअध्यक्षा स्वाती कोल्हे, माजी नगरसेवक वाल्मीक लोखंडे, माजी नगरसेवक उद्धव पवार, माजी नगरसेवक संतोष पवार, प्रभाकर चौधरी, उत्सव समिती अध्यक्ष रामेश्वर वाघ, उपाध्यक्ष संतोष बागुल, सुनिल सोनवणे, संतोष बागुल, योगेश खंडागळे, सचिन राऊत, प्रमोद चौधरी, रामेश्वर वाघ, संदिप बागुल, उमेश येळसकर, रमेश काळे, रविंद्र तायडे, राहुल वाघ, सागर लोखंडे, रमेश उचित, गणेश राऊत, कैलास वाडेकर, दिपक राऊत, अजय चौथे, संतोष दारुणकर, संदिप घोंगटे आदींची उपस्थिती होती.
