विरशैव तेली समाजाची 50 वर्षांची अखंड परंपरा: लातूर येथे महाशिवरात्रीचा भव्य उत्सव
लातूर: विरशैव तेली समाजाने गेल्या 50 वर्षांपासून जपलेली अखंड परंपरा यावर्षीही महाशिवरात्रीच्या निमित्ताने साजरी करण्यात आली. श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान येथे अमावस्येच्या दिवशी गंगाजल अभिषेक व मानाची काठी लावून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजाचे अध्यक्ष श्री किशोर भुजबळ यांच्या हस्ते मानाच्या काठीचे पूजन करण्यात आले. सोबत गुरूकृपा भजनी मंडळ मंदिर कमिटीचे विश्वस्त श्री सुरेश गोजमगुंडे यांनी काठीचे पुजन करून स्वागत केले
या उत्सवादरम्यान समाजाच्या एकात्मतेचे व परंपरेचे महत्त्व पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले. विरशैव तेली समाजाच्या या परंपरेचे रक्षण व पालन करण्यासाठी समाजातील सर्वांनी एकजूट दर्शविली. या कार्यक्रमातून समाजाच्या संस्कृतीचा व परंपरेचा गौरव साजरा करण्यात आला.
