वधु - वर फॉर्म

नागपूरमध्ये संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा भव्य जन्मोत्सव सोहळा ८ डिसेंबरला

27 November 2025 sant santaji maharaj jagnade 3 views

संताजी ब्रिगेड व तेली समाज महासभेच्या वतीने शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन

     नागपूर : संताजी ब्रिगेड महाराष्ट्र व तेली समाज महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा-२०२५ अत्यंत भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणार आहे. हा सोहळा सोमवार, दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न होईल.

Sant Shiromani Santaji Jagnade Maharaj Jayanti 2025 – Nagpur by Santaji Brigade Teli Samaj Nagpur

     सकाळी ठीक ९.०० वाजता हनुमान मंदिर, पारडी येथून भव्य शोभायात्रा निघेल. ही शोभायात्रा माँ काली मंदिर बगडगंज मार्गे श्री संत संताजी जगनाडे महाराज स्मारक, जगनाडे चौक, नंदनवन, नागपूर येथे धडकून समारोप होईल. त्यानंतर सकाळी १०.०० वाजेपासून स्मारक परिसरात भव्य महाप्रसादाचे वाटप होईल.

     कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. आ. चंद्रशेखरजी बावणकुळे (प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र), मा. कृष्णाजी खोपडे (आमदार, पूर्व नागपूर), मा. डॉ. विपीन इटनकर (जिल्हाधिकारी, नागपूर), मा. अभिजीतजी वंजारी (आमदार, विदर्भ), मा. टेकचंदजी सावरकर (माजी आमदार, कामठी), सौ. माधवीताई खोडे (अप्पर आयुक्त) यांची उपस्थिती लाभणार आहे.

     तसेच मा. श्री. शेखरजी सावरबांधे, मा. श्री. खुशाल पाहुणे, मा. श्री. नाना ढगे, मा. श्री. राधेश्यामजी हटवार, मा. श्री. पांडुरंगजी मेहर, मा. श्री. किशोर चन्ने, मा. श्री. जितेंद्र गोल्हर, मा. श्री. गंगाधरजी काचोरे, मा. श्री. रवि उराडे, मा. श्री. हरिभाऊ किरपाने, मा. श्री. शंकरराव वाडीभस्मे, मा. श्री. राकेश भावळकर, मा. श्री. कमलेश वरघने, मा. श्री. राजु साकोरे, मा. डॉ. यशवंतजी खोब्रागडे, मा. अॅड. पुरुषोत्तम घाटोळे, मा. श्री. गजानन भजभुजे, मा. श्री. संजयजी बडवाईक, मा. श्री. रमेशजी रोकडे, मा. श्री. रंजितजी गोल्हर, मा. श्री. गिरीष साखरकर यांच्यासह संताजी ब्रिगेडचे अध्यक्ष विजय हटवार, सचिव अजय धोपटे, कोषाध्यक्ष रुपेश तेलमासरे, उपाध्यक्ष संगीता तलमले व महेंद्र भुरे, सहसचिव हितेश बावणकुळे, सदस्य रमेश वंजारी, नंदू, सुभाष वाघमारे, प्रकाश तितरे, अंकुश येळणे, मा. डॉ. राम कोल्हे, मा. श्री. अभय घाटोळे, मा. श्री. देवेंद्र कैकाडे, मा. रविंद्र गायधने, मा. श्री. कुमारेशजी अवचट, मा. श्री. भोजराजजी घारपेंडे, मा. गोलु चकोले यांच्यासह संयोजक गजानन तळवेकर, सहसंयोजक मंगेश साखरकर, सुनिल मानापुरे, कुमार बावणकर, परेश भनारे, चंदु वैद्य, सुरेश धोपटे, विनोद मानकर, प्रतिक बावणकर, रोहन मोटघरे, विनोद पिसे, संजय बडवाईक, देवेंद्र बारई, धिरज वैद्य, मंगेश कामडी, पंकज तळेकर यांची प्रमुख उपस्थिती राहील.

     महिला आघाडीत श्रीमती प्रतिभा खोब्रागडे, डॉ. सौ. लिना मेंढेकर, सौ. सोनाली टिकले, सौ. स्नेहल बावणकर, सौ. सोनिया मेहर, सौ. कविता रेवतकर, सौ. प्रणोती मानापुरे, सौ. वनिता सावरकर, सौ. राधिका घाटोळे, सौ. चित्रा माकडे, सौ. मनिषा वंजारी, सौ. सोनल बावणकुळे, सौ. रक्षा खंडाळे, सौ. कविता माकडे, सौ. नर्मदा तडस, सौ. मनिषा कारवटकर, सौ. रजनी वैरागडे, सौ. श्वेता पोहाणे, सौ. दिपाश्री जुनघरे, दीपा हटवार, सौ. इंदुताई मदनकर, सौ. रत्ना बारई, सौ. वैशाली टेकाडे, सौ. शोभा जयपूरकर यांच्यासह सर्व सल्लागार, सदस्य, जिल्हानिहाय प्रतिनिधी, युवक आघाडी कामठी-कन्हान व इतर सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

     संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या भव्य सोहळ्याला नागपूरसह विदर्भातील तेली समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संताजी ब्रिगेड व तेली समाज महासभेच्या वतीने करण्यात आले आहे.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur mahila Pratigya