Bride / Groom Form

बुलढाण्यात संताजी महाराजांची ४०१ वी जयंती भव्यदिव्य साजरी होणार

05 December 2025 sant santaji maharaj jagnade 119 views

खळेगांव येथे महाप्रसाद व अभिवादन सोहळा, तेली समाजाचा उत्साह शिगेला

     बुलढाणा - संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती यंदा तेली समाज बुलढाण्‍यात उत्साहात साजरी करणार आहे. जय संताजी तेली समाज व जय संताजी नवयुवक मंडळ, खळेगांव (ता. लोणार) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत भव्य अभिवादन सोहळा आणि त्यानंतर ३ ते ६ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Santaji jagnade Maharaj Jayanti in Buldhana by Buldhana Teli Samaj

    सोहळ्याचे ठिकाण ज्ञानगंगा प्राथमिक आश्रम शाळेजवळ, खळेगांव (ता. लोणार, जि. बुलढाणा) असणार आहे. या प्रसंगी तेली समाजाचे दिग्गज नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख उपस्थिती

  • श्री. सुभाषराव बबनराव देव्हडे (प्रा. तैलिक महासंघ जिल्हाध्यक्ष, बुलढाणा)
  • श्री. रमेशराव आकोटकर (राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र)
  • श्री. सतिष गायकवाड (संताजी कॉन्व्हेंट अध्यक्ष, मेहकर)
  • श्री. विष्णुपंत पाखरे (प्रा. तैलिक महासंघ माजी जिल्हाध्यक्ष, बुलढाणा)
  • सौ. सुषमा राऊत (महिला जिल्हाध्यक्ष, बुलढाणा)
  • श्री. विजय सोनुने (जिल्हा उपाध्यक्ष, बुलढाणा)
  • श्री. बंडुशेठ वाघमारे (संताजी कॉन्व्हेंट, मेहकर)
  • श्री. अशोक इंगळे (प्रसिद्धी प्रमुख)
  • श्री. नंदकिशोर गायकवाड (सचिव, बुलढाणा)
  • श्री. डॉ. गणेश राऊत (तालुका अध्यक्ष, लोणार)
  • श्री. दत्ता भाऊ करवंदे (तालुका अध्यक्ष, चिखली)
  • श्री. गजानन वाडेकर (जानेफळ)
  • श्री. डॉ. शंकरराव बोरशे (सामाजिक कार्यकर्ते)
  • श्री. संतोष डोमळे (घाटबोरी)
  • श्री. परमेश्वर क्षिरसागर (उपशिक्षण अधिकारी, बुलढाणा)
  • श्री. प्रथमेश विजय क्षिरसागर (लिपिक)
  • श्री. प्रतिक सुभाष वेंडोले (कालवा निरीक्षक)
  • श्री. ओम सुरेश सरोदे (Gov. MBBS, Akola)

    संताजी महाराजांच्या तत्त्वज्ञानाला आणि तेली समाजाच्या एकतेला बळ देणारा हा सोहळा खळेगांवसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील तेली बंधू - भगिनींसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. आयोजकांनी सर्व समाज बंधूंना सपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

जय संताजी महाराज! जय तेली समाज ! ????

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

dussehra milan samaroh and Garba Mahotsav Sahu