संताजी महाराज जयंतीनिमित्त ८ डिसेंबरला भव्य सामाजिक उपक्रम – जालना तेली समाजाचे भव्य आयोजन
जालना । संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त यंदा जालना शहरात सकल तेली समाजाच्या वतीने सोमवार, ८ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण दिवस भव्य सामाजिक सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. “नर सेवा ही नारायण सेवा” या भावनेने प्रेरित हा उपक्रम सकल तेली समाज, जय संताजी युवा मंच, सकल तेली महिला मंडळ, श्री पु. रुपचंद उस्ताद आखाडा व सकल हिंदू समाज यांच्या संयुक्त विद्यमाने तिळवंत तेली पंचायती वाडा, मोदिखाना, जालना येथे होणार आहे.
दिवसभराचे कार्यक्रम
- सकाळी ९.३० वाजता : भव्य गौचारा वाटप – पांजरापोळ गौशाला, जालना सौजन्य : विक्की विष्णू वाघमारे
- सकाळी १०.३० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत :
- मोफत दंत चिकित्सा शिबिर – डॉ. श्रद्धा पियुष होलाणी (बी.डी.एस.) सौजन्य : ज्ञानेश्वर सुधाकरराव क्षिरसागर
- मोफत नेत्र तपासणी शिबिर – चष्मा मार्ट आय क्लिनीक ॲण्ड ऑप्टीकल सौजन्य : उमेश सोपान पेंढारकर, आकाश महादेव देशमाने
- रक्तदान शिबिर – जनकल्याण रक्तपेढी, जालना सौजन्य : आकाश महादेव देशमाने, उमेश सोपान पेंढारकर
या सर्व शिबिरांमध्ये गरजू नागरिकांना मोफत उपचार व सुविधा मिळणार आहेत. रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र व सन्मान मिळेल.
प्रमुख उपस्थिती व आयोजक
- अध्यक्ष : नागेश रमेश पहेलवान क्षिरसागर, विनोदसेठ मोहनराव सिनगारे, विश्वनाथसेठ लक्ष्मणराव क्षिरसागर
- महिला प्रमुख : सौ. चंद्रकलाबाई शंकरराव देशमाने, सौ. ज्योतीबाई राधाकिशन कोरडे
- व्यवस्थापक : श्रीराम बाबासाहेब साखरे (9422334220)
- संपर्क : नागेश रमेशराव क्षिरसागर (9511718894), उमेश रघुनाथराव गवारे (9527779080), ऋषिकेश श्रीरामराव करपे (9325158580)
सकल तेली समाज, जालना ने सर्व समाज बंधू-भगिनींना आवाहन केले आहे की, ८ डिसेंबरला मोठ्या संख्येने उपस्थित राहून संताजी महाराजांच्या जयंतीला आणि या सेवाकार्याला यशस्वी करावे.
जय संताजी महाराज! जय तेली समाज! ????
