Bride / Groom Form

नाशिक तेली समाज भव्यदिव्य स्‍वरूपात साजरा करणार संत संताजी जगनाडे महाराज जन्‍मउत्‍सव

07 December 2025 sant santaji maharaj jagnade 202 views

     नाशिक। संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती यंदा नाशिकमध्ये अतिशय भव्यदिव्य स्वरूपात साजरी होणार आहे. श्री संताजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, रणरागिणी महिला मंडळ व श्री संताजी युवक मंडळ (पंचवटी विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता भव्य शोभायात्रा व अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Nashik Teli Samaj Santaji Maharaj Jagnade janmotsav – Grand Shobhayatra from Panchavati to Tapovan

     शोभायात्रा सकाळी ठीक ३ वाजता पंचवटी कारंजा येथून निघेल आणि पारंपरिक व सांस्कृतिक वाद्यांच्या गजरात आठवण लॉन्स, चव्हाण नगर, तपोवन, पंचवटी, नाशिक येथे समारोप होईल. या शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे ढोल-ताशा, लेझीम, तुतारी, झांज पथक यांचा धडाका आणि संताजी महाराजांच्या भजन-कीर्तनांचा गजर. संपूर्ण पंचवटी परिसर संताजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमून निघणार आहे.

प्रमुख पाहुणे

  • मा. आमदार अॅड. राहुल ढिकले (नाशिक पूर्व)
  • मा. डॉ. भूषण कर्डिले (महासचिव, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा)
  • मा. भानुदासशेठ चौधरी (संचालक, नामको बँक)
  • मा. सौ. हितेश वाघ (नाशिक शहर तेली समाज अध्यक्षा)
  • मा. जितेंद्र बेलगांवकर
  • मा. गजानन (नाना) शेलार (कार्याध्यक्ष, म.प्रा.ते.म., नगरसेवक)
  • अॅड. यतिनजी (महाराज) वाघ (मा. महापौर, नाशिक महानगरपालिका)
  • मा. संदिप शेजोळे (कार्यक्रमाचे अध्यक्ष)
  • मा. सौ. सरीता सोनवणे (महिला अध्यक्षा, नाशिक शहर तेली समाज)
  • मा. विक्रांत चांदवडकर

आयोजक व संपर्क

  • प्रमुख सल्लागार : मा. नरेंद्र (नाना) पवार (संचालक, नामको बँक)
  • अध्यक्ष : अमोल कर्पे (पंचवटी विभाग)
  • महिला अध्यक्षा : अॅड. सौ. गीता चांदवडकर
  • युवक मंडळ अध्यक्ष : राज ठाकरे
  • प्रमुख कार्यकर्ते : निलेश खैरनार, अरुण क्षिरसागर, स्वप्निल खैरनार, प्रविण चांदवडकर, मिलिंद राऊत, नंदकुमार जाधव, रंजनशेठ बिरारी, विनायक कस्तुरे, मयुर लोखंडे, संतोष सोनवणे, दत्तात्रय राऊत, सचिन शिंदे, सुनिल केदार, सौ. वैशाली जाधव, सौ. शितल शेजोळे

नाशिक शहरातील सर्व तेली समाज बांधवांना सपरिवार उपस्थित राहून शोभायात्रेची व सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

जय संताजी महाराज! जय तेली समाज! ????

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Umarga Teli Samaj Organization protest against Dhule atyachar