वधु - वर फॉर्म

अमळनेरमध्ये संताजी जगनाडे महाराजांची भव्य जयंती, पुण्यतिथी व पालखी महोत्सव

07 December 2025 sant santaji maharaj jagnade 43 views

८ डिसेंबरला शोभायात्रा, १७ डिसेंबरला पुण्यतिथी व कीर्तन सोहळा

     अमळनेर (जि. जळगाव)। संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती व पुण्यतिथी यंदा अमळनेरमध्ये अतिशय उत्साहात साजरी होणार आहे. तेली पंच मंडळ, तेली युवक मंडळ व संताजी महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने दोन टप्प्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Amalner Teli Samaj organized Santaji Maharaj Jayanti & punyatithi

पहिला टप्पा – जयंती व पालखी महोत्सव सोमवार, ८ डिसेंबर २०२५ (मार्गशीर्ष कृष्ण ४, शके १९४७)

  • सकाळी ९.३० वाजता : संताजी महाराज मंदिर, संताजी चौक, माळीवाडा येथे सामूहिक पूजन
  • दुपारी ४.०० वाजता : महाआरती व पालखी पूजन
  • त्यानंतर भव्य पालखी शोभायात्रा : संताजी चौक → वाडी चौक → सराफ बाजार → दगडी दरवाजा → पाचकंदील चौक → मुंबई गल्ली तेली भुवन → कुंटे रोड → झामी चौक → पुन्हा संताजी मंदिर (समारोप)

शोभायात्रेचे शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे

  • मा. आ. दादासो. शिरीष हिरालाल चौधरी
  • मा. आप्पासाहेब राजाराम वामन चौधरी
  • सौ. अनिताताई शिरीष चौधरी
  • सौ. लिलाबाई राजाराम चौधरी

दुसरा टप्पा – पुण्यतिथी कार्यक्रम बुधवार, १७ डिसेंबर २०२५

  • सकाळी ९.३० वाजता : पादुका पूजन व मूर्ती पूजन (संताजी महाराज मंदिर)
  • रात्री ७.०० वाजता : कीर्तन सोहळा कीर्तनकार : ह.भ.प. हेमंत महाराज (रा. नांद्रा, जि. जळगाव) टाळकरी : माऊली भजनी मंडळ, पैलाड-अमळनेर

विशेष महाराष्ट्र शासनाने २०१९ मध्ये संताजी महाराजांना “राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती” म्हणून मान्यता दिली असून त्यांची जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांत साजरी करण्याचे परिपत्रक काढले आहे. या सन्मानाचा आनंद म्हणून अमळनेर तेली समाज २०१९ पासून जयंती व पालखी महोत्सव जल्लोषात साजरा करीत आहे.

आयोजक व संपर्क

  • अध्यक्ष : संजय सुदाम चौधरी (९५४५४५४५७५ / ९४२३९१३५००)
  • सचिव : एकनाथ माधव चौधरी
  • सहसचिव : पराग अरुण चौधरी
  • संघटक : संजय भिकन चौधरी
  • कार्यकारी सदस्य : प्रा. एस. आर. चौधरी, नरेंद्र विष्णू चौधरी, शांताराम नारायण चौधरी, लक्ष्मण नामदेव चौधरी, हिम्मत सदाशिव चौधरी, सोनू भटू चौधरी, जगदीश लोटन चौधरी, आत्माराम जगन्नाथ चौधरी, रविंद्र बाबुराव चौधरी, प्रा. ई. टी. चौधरी, अरुण रतन नेरकर, सुनिल विश्वास चौधरी, ललित मधुकर चौधरी
  • उपाध्यक्ष : सुरेश सखाराम चौधरी
  • खजिनदार : अरुण धोंडू चौधरी
  • सहखजिनदार : सुरेश रतन चौधरी
  • सल्लागार : आबा नामदेव चौधरी
  • समाजसेवक : मधुकर दामू सैंदाणे

अमळनेर तेली समाजाने सर्व समाज बंधू, माता-भगिनींना सपरिवार उपस्थित राहून संताजी महाराजांना अभिवादन करण्याचे आवाहन केले आहे.

जय संताजी महाराज! जय तेली समाज! ????

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Amravati Teli Samaj Gunvant Vidyarthi Satkar