वधू - वर फॉर्म

नाशिक तेली समाजा वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव उत्‍साहात संपन्‍न

09 December 2025 sant santaji maharaj jagnade 200 views

    श्री संत संताजी महाराज व विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रथम वर्धापन दिन व श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव ध्रुवनगर ,सातपूर, नाशिक येथे सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Nashik Teli Samaj Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Utsav

    श्री सत्यनारायण पूजा करण्यात आली त्यानंतर आजच्या नवीन पिढीला श्री संताजी महाराजांच्या विषयी ह.भ.प. निलेश जाधव महाराज आळंदी यांनी सविस्तर प्रवचन केले व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

     महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कार्याध्यक्षश्री गजानन ( नाना) शेलार यांनी समाजाची जनगणना झाली पाहिजे यांविषयी सांगितले तसेच माजी सभागृह नेते श्री दिनकर (अण्णा) पाटील यांनी जसे संताजी मंदिर बांधून दिले तसे स्वखर्चाने सभा मंडप बांधून देण्याचे आश्वासन दिले माजी नगरसेविका सौ लता दिनकर पाटील युवा नेते श्री अमोल पाटील माजी नगरसेवक श्री रवींद्र धिवरे,भाजपा शहराध्यक्ष श्री निखिल पवार सौ सोनाली पवार सौ वृषाली ताई सोनवणे श्री नरेश सोनवणे श्री जयेश बागडे सौ हितेश ताई वाघ सुनील शिरसाट व सिडको मंडळ व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

भक्त शिरोमणि माँ कर्माबाई का जीवन परिचय | Biography of Maa Karma Bai | Maa Karma Devi Story