Bride / Groom Form

पाटीलकी आणि तेली समाज

06 March 2016 Teli samaj 214 views

            महाराष्ट्र  कर्नाटक आणि तेलंगणा या प्रदेशात  तेली आणि  इतर समाजात भरपुर जणान कडे पाटीलकी आहे. या पदाचा आणि  जातीचा काही ही संबंध नाही. 

         बऱ्याच जणांना 'पाटील' या अधिकारपदाची सुरुवात शिवरायांनी केली, असे वाटते. सत्य इतिहास असा नसून 'पाटील' हे पद शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून अस्तित्वात होते. शिवरायांचे पणजोबा बाबाजी भोसले हे वेरूळ गावचे पाटील होते. मुळात 'पाटील' या पदाचा उगम सातवाहन काळात झालेला दिसतो. सातवाहनांच्या काळात सातवाहन राजांनी महसूल वसुलीसाठी 'पट्टखील' हे पद निर्माण केले होते. पट्टखीलचा (पट्ट म्हणजे शेतीचे पट्टे आणि खील म्हणजे महसूल वसुली करणारा अधिकारी) अर्थ होतो, शेतीवर महसूल वसुली करणारा अधिकारी. या 'पट्टखील' शब्दाचा पुढे 'पाटील' असा अपभ्रंश झाला. पुढे या पदाला ग्राम पातळीवर आणखीही बरेच अधिकार प्राप्त झाले आणि त्यामुळे प्रतिष्ठाही प्राप्त झाली. असा आहे 'पाटील' पदाचा सत्य इतिहास.

         या पदाचा आणि जातीचा काहीही संबंध नाही. महाराष्ट्रात तसेच, महाराष्ट्राबाहेर कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांमध्ये कुणबी, तेली, माळी, धनगर, महार इ. अनेक जाती-जमातींच्या पूर्वजांना ही जबाबदारी देण्यात आली होती, त्यामुळं सर्वच जातीजमाती पाटील हे उपनाम लावतांना दिसतात.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

झारखंड तेली समाज इतिहास और अनुसूचित जनजाति (ST) में शामिल करने की मांग – Teli Caste in Jharkhand