Bride / Groom Form

सुदुंबरे (पुणे) : संताजी महाराज पुण्यतिथी निमित्त ११ ते १८ डिसेंबर २०२५ दरम्यान भव्य अखंड हरिनाम सप्ताह, गाथा पारायण व महाप्रसाद सोहळा

14 December 2025 sant santaji maharaj jagnade 243 views

     सुदुंबरे (ता. मावळ, जि. पुणे)। संत तुकाराम महाराजांचे प्रिय शिष्य, अभंग गाथेचे रक्षक आणि तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी यंदा श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे यांच्या वतीने अतिशय भक्तिमय व भव्यदिव्य स्वरूपात साजरी होणार आहे. मार्गशीर्ष वद्य सप्तमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी (गुरुवार, ११ डिसेंबर ते गुरुवार, १८ डिसेंबर २०२५) या आठ दिवसांच्या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

Santaji Jagnade Maharaj Punyatithi Sohla at Santaji Jagnade Maharaj Sudumbare Samadhi Mandir

     दररोज सकाळी ४.३० वाजता काकड आरती, त्यानंतर सकाळी ९ ते ११ वाजता महापूजा व अभिषेक, दुपारी १२ ते ३ वाजता तुकाराम गाथा पारायण, संध्याकाळी ४ ते ८ वाजता प्रवचन व रात्री ९ नंतर भजन-कीर्तन व जागर असे कार्यक्रम होतील. दररोज हजारो भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रमुख कीर्तनकार व प्रवचनकार

  • ह.भ.प. अनिकेत महाराज मोटे (पुणे)
  • ह.भ.प. गणेश महाराज चिंचकर
  • ह.भ.प. सोपान महाराज पाटील
  • ह.भ.प. गणेश महाराज बेलसे
  • ह.भ.प. भिमराव महाराज भिंगे
  • ह.भ.प. भाऊसाहेब महाराज आंधळे
  • ह.भ.प. रामचंद्र महाराजन पाटील
  • ह.भ.प. बाळकृष्ण महाराज भिंगे
  • ह.भ.प. अशोक महाराज मोरे (नाशिक)

विशेष कार्यक्रम

  • गुरुवार, १८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता पालखी सोहळा व महाआरती
  • रविवार, २८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा (सुदुंबरे)

    संस्थेच्या वतीने सर्व विभागातील तेली समाज बांधव, श्रीक्षेत्र सुदुंबरे व सुदवडी ग्रामस्थांना सपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आयोजकांनी सर्व भाविकांना विनंती केली आहे की, संताजी महाराजांच्या पुण्यतिथीला उपस्थित राहून अखंड हरिनाम सप्ताहाला यशस्वी करावे.

    सुदुंबरे हे संताजी महाराजांचे समाधीस्थळ असल्याने दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. यंदा आठ दिवस चालणारा हा सोहळा विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.

जय संताजी महाराज! जय तेली समाज!

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj hareli utsav in Telibandha Talab