वधु - वर फॉर्म

पांढरकवड्यात तेली समाजाची भव्य 'संताजी प्रेरणा यात्रा' उत्साहात संपन्न – क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती, गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती देऊन गौरव

12 February 2026 sant santaji maharaj jagnade 10 views

     पांढरकवडा, दि. ०७ जानेवारी : सकल तेली समाज पांढरकवडा यांच्या वतीने आयोजित 'संताजी प्रेरणा यात्रा' आणि गुणगौरव सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात आणि भव्यतेने पार पडला. या कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आणि सेवानिवृत्त गटा-विकास अधिकारी यशवंतराव माकडे यांचा त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक कार्यासाठी 'समाज भूषण' पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

Buldhana Teli Samajs Grand Santaji Prerana Yatra Successfully Held Sports Icons Motivate Youth Schol

     संताजी नगर ते संताजी भवन या मार्गावर निघालेल्या या प्रेरणा यात्रेला आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. यात्रेनंतर आयोजित गुणगौरव सोहळ्यात कराटे, हॉकी, बॉडी बिल्डिंग आणि हँडबॉल या क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात जीवाचा काहीही भरोसा नाही. त्यामुळे तरुणांनी अभ्यासाबरोबरच व्यायाम आणि खेळावरही भर देणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना फक्त अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता, त्यांच्या आवडीच्या खेळात प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव माकडे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. आनंद भुसारी (सचिव, जिल्हा कराटे असोसिएशन), अविनाश लोखंडे (उपाध्यक्ष, विदर्भ बॉडी बिल्डर असोसिएशन), मनीषा आखरे (उपाध्यक्ष, हॉकी महाराष्ट्र व सचिव, जिल्हा हॉकी असोसिएशन), ज्ञानेश्वर रायमल, राजेंद्र दहापुते, उर्मिला दहापुते, विवेक डेहनकर उपस्थित होते.

     यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक आतिश चव्हाण आणि आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त राजेंद्र गोबाडे यांचा समाज बांधवांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

     गुणगौरव सोहळ्यात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरवण्यात आले. इयत्ता दहावीमध्ये तालुक्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनी खुशी रोहन नरताम यांना स्व. सौ. नलिनीताई यशवंतराव माकडे यांच्या स्मृतीत रु. १०,०००/- ची शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच इयत्ता बारावी विज्ञान शाखेत तालुक्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनी गायत्री पुंडलीक भांडेकर यांना स्व. नलिनीताई यशवंतराव माकडे यांच्या स्मृतीत रु. १२,०००/- ची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्व. शिवाजीराव चव्हाण व स्व. जीवन शिवाजीराव चव्हाण यांच्या स्मृतीत शिष्यवृत्ती अनुक्रमे धूप संतोष सातपुते आणि मोहीत रविंद्र सावरकर यांना देण्यात आली.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव धनंजय आंबटकर यांनी केले. सूत्रसंचालन सचिनराव बोंद्रे व सुचिता चव्हाण वैरागडे यांनी केले. आभार प्रदर्शन दिनेश पिंपळे यांनी मानले.

     सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन समस्त संताजी मंडळ, पांढरकवडा यांच्या वतीने करण्यात आले होते.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Madhya Pradesh tailik Sahu Mahasabha mahila sammelan