वधु - वर फॉर्म

तेली समाज सभा, नागपूरकडून युवक-युवती परिचय पत्र नोंदणीसाठी आवाहन

30 May 2026 teli samaj vadhu var melava 306 views

     नागपूर : तेली समाज सभा, नागपूर (जिल्हा) यांच्या वतीने समाजातील युवक-युवतींसाठी परिचय पत्र नोंदणी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत युवक-युवतींना आपली माहिती नोंदविण्यासाठी निशुल्क नोंदणी प्रपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.

teli samaj yuvak yuvati parichay form

     संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नोंदणी करताना युवक किंवा युवतीचा अलीकडील फोटो अर्जासोबत जोडणे आवश्यक असून फोटोच्या मागील बाजूस संबंधिताचे नाव स्पष्टपणे लिहिणे बंधनकारक आहे. 

     भरलेले नोंदणी प्रपत्र तेली समाज सभेच्या मुख्य कार्यालयात जमा करावेत. मुख्य कार्यालय संताजी सांस्कृतिक सभागृह, सोमवारी क्वॉर्टर, बुधवार बाजार, नागपूर येथे असून अधिक माहितीसाठी 8446055125 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच संस्थेचे कार्यालय मिरची बाजार चौक, इतवारी, नागपूर येथे कार्यरत आहे. समाजातील पात्र युवक-युवतींनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तेली समाज सभा, नागपूर (जिल्हा) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

हेमू तेली विक्रमादित्य आखिरी हिंदु राजा - Last Hindu King Hemu Vikramaditya (Teli)| Mughals vs Hemu