वधु - वर फॉर्म

श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा च्‍या वतीने कौटुंबिक साहित्याच्या वाटप...

03 June 2026 O.B.C. 182 views

पारधी समाज व गोसावी समाजाला कौटुंबिक साहित्याच्या वाटपाचा भव्य कार्यक्रम.. यशस्वीरित्या पूर्ण..कौटुंबिक साहित्य वाटप

    श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा महाराष्ट्र या संस्थेमार्फत दिनांक ३-५-२०२६ रोजी तांबी फाटा, तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे पारधी समाज व गोसावी समाजाच्या लोकांना कौटुंबिक साहित्याच्या वाटपचा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण झाला.

Distribution of family literature on behalf of Shri Santaji Educational and Social Development Institute Satara

    निस्पृह व निस्वार्थ भावनेने एखादा सामाजिक कार्यक्रम केल्यानंतर त्या कार्यक्रमाला किती उत्कृष्ट पद्धतीने यश मिळते, समाजाचा प्रतिसाद मिळतो , याचे हे अत्यंत उत्तम उदाहरण म्हणून आजच्या कार्यक्रमाची नोंद करण्यात येईल. या कार्यक्रमांमध्ये पारधी समाजाचे व गोसावी समाजाचे लाभधारक फार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांची उपस्थितीत आज समाजामध्ये अशा कार्यक्रमांची किती नितांत गरज आहे हे दर्शवत होते.

Shri Santaji Foundation Distributes Family Welfare Kits in Satara

    पारधी समाज डोंगराच्या पायथ्याला, ओसाड माळावरती, गावाच्या बाहेर झोपड्या टाकून आपला उदरनिर्वाह करत असतात . सर्व सामान्य माणसाचा या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळ्या प्रकारचा आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस या समाजापासून दूर व थोडा भीतीयुक्त पद्धतीने राहत असतो. हा समाज आतापर्यंत शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत मागास तर होताच परंतु उदरनिर्वाचेही काही साधन नसल्याने अत्यंत कठीण पद्धतीने जीवन कंठत असलेला दिसतो. यासोबतच गोसावी समाजही  आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला समाज असल्याने या समाजालाही खऱ्या अर्थाने मदतीची गरज असल्याचे दिसून येते. या ठिकाणी या दोन्ही समाजाची सर्वसाधारण माहिती घेतल्यानंतर संघटनेने असे ठरवले की या वस्ती वरती या समाजाला मदत करणे नीतांत गरजचे आहे व त्याप्रमाणे निर्णय घेऊन मदतीचा कार्यक्रम ठरविण्यात आला.

    या कार्यक्रमांमध्ये पारधी समाजामधील एका तरुण महिलेने आपले मनोगत व्यक्त करताना अत्यंत हृदयाला स्पर्श करून जातील अशा शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. आमचा समाज आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास आहे. आमच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनही वेगळ्या प्रकारचा आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने जो सुधारित समाज आहे त्यांनी आम्हाला मदत करावी किंवा आम्हाला मार्गदर्शन करावे , आपले आशीर्वाद द्यावेत असे अपेक्षित आहे. आज आपण सर्वजण या ठिकाणी येऊन आम्हाला जी मदत करत आहात त्यासाठी आम्ही सर्व समाजातर्फे आपले मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. माझी मुलगी ही आश्रम शाळा बामनोली येथे शिकत असून तिलाही आपल्यासारख्या दानशूर बांधवांच्या मदतीमुळे शिक्षणामध्ये फार मदत मिळत आहे. त्या मुलीची शैक्षणिक प्रगती पाहता त्या मुलीलाही उत्स्फूर्तपणे श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांनी भरघोस आर्थिक मदत केली.

आजच्या या कार्यक्रमांमध्ये ५५ लाभार्थ्यांनी कौटुंबिक साहित्य स्वीकारण्याचा लाभ घेतला. उपस्थित लाभार्थ्यांची संख्या पाहता कार्यक्रम  अत्यंत यशस्वी झाला . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माननीय श्री अर्जुन लोखंडे व सौ लोखंडे, श्रीयुत मारुती दळवी यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली. श्री अर्जुनराव लोखंडे यांनी स्वतःच्या घरामध्ये या कार्यक्रमासाठी जागा दिली. बैठकीची व्यवस्था केली आणि सर्व लाभार्थींना नाष्टा व इतर सर्व सोयी उपलब्ध करून दिली. या सहकार्यासाठी संघटनेमार्फत त्यांचे मनःपूर्वक आभार.

    आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने संघटनेच्या महिला अध्यक्ष सौ सुरेख आडके म्हणायला आम्ही समाजातील असे सामाजिक मागास व आर्थिक मागास घटक पाहत असतो व त्यांना दरवर्षी अशा प्रकारे कौटुंबिक साहित्याची मदत करत असतो आज आम्ही आपल्यामध्ये येऊन आपणाला आम्हाला शक्य आहे त्याप्रमाणे आपली मदत करत आहोत ही सर्व मदत श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेचे सर्व पदाधिकारी स्वतःच्या खिशातून करत असतात यासाठी कोणताही संस्थेचा पैसा वापरत नाहीत आम्हाला आपणाला मदत करताना नेहमीच आनंद वाटत असतो.

    संस्थेचे अध्यक्ष राम पडगे यांनी या सर्वांना संबोधित करताना म्हणाले की आज आपल्या सर्वांच्या मध्ये सहभागी होण्याचा आम्हाला जी संधी मिळत आहे यासाठी निश्चितच आम्ही कुठल्यातरी पूर्वजन्मी काहीतरी पुण्य केलेले असावे. आपल्या सर्वांच्या सोबत राहुल आम्हाला जो आनंद मिळत आहे तो निश्चितच अतिशय अनमोल आहे. माणसाने माणसावर प्रेम करावे माणसाने माणसासाठी जगावे याला अनुसरून आम्हाला जेवढे शक्य होईल त्याप्रमाणे आम्ही आपणाला मदत करत आहोत. संघटना दरवर्षी एका आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकाची निवड करून त्यांना अशा प्रकारे साहित्य वाटप असते. संघटनेने आतापर्यंत अत्यंत उत्कृष्ट प्रगती केली असून संघटना आज ८० जी मान्यता प्राप्त, एनजीओ मान्यता प्राप्त व भारत सरकारचे सीएसआर वन प्रमाणपत्र प्राप्त अशी संस्था असून याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. हे सर्व मिळवण्यासाठी अत्यंत पारदर्शक व्यवहार व निस्वार्थ भावनेने काम करणारे सहकारी असावे लागतात. मी याबाबतीत अत्यंत भाग्यवान आहे की मला असे सर्व सहकारी मिळालेले आहेत मी त्या सर्वांचे निश्चितच या निमित्ताने धन्यवाद व्यक्त करतो .आज या कार्यक्रमासाठी वयाच्या 85 व्या वर्षी माननीय श्री दयारामजी हाडके उपस्थित आहेत. आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष माननीय विठ्ठलराव शिरसागर वयाच्या 80 व्या वर्षी धडपडत आहेत .आमच्या संघटनेचे जिल्हा समन्वयक पोपटराव भोज आज वयाच्या 75 नंतर काम करत आहे असे अनेक समाजाला वाहून घेणारे लोक माझ्यासोबत असलेले असे चांगले काम करण्याची संधी आम्हाला प्राप्त होत आहे आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला व आम्ही दिलेली मदत आपण प्रेमाने स्वीकारत आहात यासाठी मी आपले सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आजचा हा कार्यक्रम आमच्या संघटनेच्या महिला अध्यक्ष सौ सुरेखा हाडके व जिल्हा समन्वयक पोपटराव भोज व सौ भोज यांच्या मदतीने होत आहे याची ही नोंद संघटनेने घेतली असून संघटना त्यांचे ही धन्यवाद व्यक्त करते.

    आजच्या या कार्यक्रमासाठी संघटनेचे अध्यक्ष राम पडघे उपाध्यक्ष विठ्ठलराव शिरसागर सचिव नामदेवराव झगडे जिल्हा महिला अध्यक्ष सौ सुरेखा हाडके, जिल्हा समन्वय पोपटराव भोज तालुका समन्वय शिवाजीराव गंधाले जावली तालुकाध्यक्ष राजेंद्र किर्वे माण तालुका अध्यक्ष शिवदास किरवे फलटण तालुका अध्यक्ष अमोल राऊत सातारा तालुका अध्यक्ष अनिल किरवे जावली तालुका महिला अध्यक्ष अश्विनी किरवे तेली समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक व संघटनेचे मार्गदर्शक श्री दयारामजी हाडके प्रदीप देशमाने, मारुती शिरसागर राजेंद्र हाडके श्री राऊत श्रीयुत युवराज खेडकर बबन किरवे अरुण किरवे विलास किरवे याशिवाय लोखंडे परिवार व या परिसरातील समाज बांधव उपस्थित होते.

आपला - राम पडघे - अध्यक्ष श्री संताजी शैक्षणिक सामाजिक विकास संस्था सातारा महाराष्ट्र.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Beed gunvant vidyarthi satkar by Jaydutt Kshirsagar