वधु - वर फॉर्म

श्री संत संताजी आर्ट गॅलरी नागपूर येथे मुलांसाठी इंट्युशन प्रोसेस, मेधा योगा व उत्कर्ष योगा प्रशिक्षण उत्साहात संपन्न

16 June 2026 sant santaji maharaj jagnade 213 views

     नागपूर : श्री संत संताजी आर्ट गॅलरी चे प्रनेते मा. *श्री कृष्णाजी खोपडे*, आमदार नागपूर यांच्या प्रेरणेतून उन्हाळी सुट्ट्यांचा सदुपयोग करून मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेमार्फत दिनांक १० जून ते १३ जून २०२६ या कालावधीत श्री संताजी आर्ट गॅलरी येथे मुलांसाठी इंट्युशन प्रोसेस, मेधा योगा व उत्कर्ष योगा या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

Shri Sant Santaji Art Gallery Nagpur Hosts Inspiring Intuition Process and Yoga Training for Children

     या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक व भावनिक विकासावर विशेष भर देण्यात आला. इंट्युशन प्रोसेस या प्रशिक्षणामुळे मुलांची अंतर्ज्ञान क्षमता, एकाग्रता, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता विकसित होण्यास मदत होते. तसेच मेधा योगा व उत्कर्ष योगा यांच्या माध्यमातून स्मरणशक्ती वाढणे, अभ्यासातील लक्ष केंद्रित होणे, तणाव कमी होणे, सकारात्मक विचारसरणी निर्माण होणे आणि शारीरिक-मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते, अशी माहिती प्रशिक्षकांनी विद्यार्थी व पालकांना दिली.

     या प्रशिक्षणासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रसिद्ध प्रशिक्षिका *सौ. प्रतिभा शेट्टी* यांनी इंट्युशन प्रोसेसचे मार्गदर्शन केले. तर सौ. सोनल स्वान यांनी मेधा योगा व उत्कर्ष योगाचे प्रशिक्षण देत विद्यार्थ्यांना विविध योगक्रिया, ध्यान पद्धती आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या उपयुक्त तंत्रांचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणात मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध उपक्रमांचा लाभ घेतला.

     सदर कार्यक्रमाचे आयोजन *सौ. नीलिमा अविनाश तलमले व श्री. सुरेश कुबडे* यांनी केले. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कौशल्यांचा विकास करण्यावर भर देण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी पालकांनीही अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत आयोजकांचे कौतुक केले.

     या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री संत संताजी स्मारक समिती चे अध्यक्ष *डॉ. यशवंत खोब्रागडे-देशमुख, श्री संत संताजी आर्ट गॅलरीचे श्री प्रदीप वाडीभस्मे तसेच श्री कुणाल धनजोडे* यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आयोजकांनी सर्व सहकारी, पालक आणि सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानले.

     उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते प्रेरणादायी ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Umarga Teli Samaj Organization protest against Dhule atyachar