जवाहर विद्यार्थी गृह, नागपूरतर्फे तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा भव्य सत्कार सोहळा
तेली समाजातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा होणार गौरव
नागपूर येथील सुप्रसिद्ध संस्था जवाहर विद्यार्थी गृह यांच्यातर्फे यंदाही तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी, उच्चशिक्षित मान्यवर तसेच समाजातील आदरणीय व्यक्तींचा गौरवपूर्ण सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. हा भव्य कार्यक्रम संस्थेच्या सिव्हिल लाईन्स येथील कार्यालयात संपन्न होणार असून, समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या व्यक्तींना यानिमित्ताने सन्मानित करण्यात येणार आहे. शैक्षणिक यश, प्रशासकीय कर्तृत्व, संशोधन क्षेत्रातील योगदान, आदर्श वैवाहिक जीवन आणि ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव — अशा विविध पैलूंना यावेळी अधोरेखित केले जाणार आहे.
? सत्कारासाठी पात्रता गट व आवश्यक कागदपत्रे
१️ गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी (मार्च २०२६)
पात्रता : दहावीत ९०% पेक्षा अधिक तसेच बारावीत ८५% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले विद्यार्थी
आवश्यक कागदपत्रे : गुणपत्रिका, लिव्हिंग सर्टिफिकेट, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर व संपूर्ण पत्ता
२️ Ph.D. प्राप्त विद्यार्थी
पात्रता : विविध विषयांत मागील वर्षी डॉक्टरेट (Ph.D.) पदवी संपादन केलेले युवक-युवती
आवश्यक कागदपत्रे : डिग्री प्रमाणपत्र, सर्टिफिकेट, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर व पत्ता
३️ MPSC / UPSC उत्तीर्ण विद्यार्थी
पात्रता : मागील दोन वर्षांत MPSC अथवा UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय नोकरीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी
आवश्यक कागदपत्रे : परीक्षा उत्तीर्णतेचा अधिकृत पुरावा, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर व पत्ता
४️ आदर्श वैवाहिक जीवन सत्कार
पात्रता : ज्या दांपत्यांच्या विवाहाला यशस्वी ५० वर्षे पूर्ण झाली आहेत असे जोडपे
आवश्यक कागदपत्रे : उभयतांचे आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर व पत्ता
५️ जेष्ठ नागरिकांचा सन्मान
पात्रता : ज्यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत असे ज्येष्ठ नागरिक
आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर व पत्ता
? माहिती सादर करण्याची अंतिम मुदत
तेली समाजातील वरील सर्व प्रवर्गांतील पात्र मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यासाठी संस्था कटिबद्ध असून, इच्छुक व्यक्तींनी आपली संपूर्ण माहिती व आवश्यक कागदपत्रे १५ जुलै २०२६ पर्यंत संस्थेच्या सिव्हिल लाईन्स तसेच नंदनवन कार्यालयात सादर करावीत, असे कळकळीचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शेखर सावरबांधे आणि मुख्य कार्यवाह गंगाधर काचोरे यांनी केले आहे.
?️ सत्कार सोहळ्याची तारीख
रविवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२६
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क
सिव्हिल लाईन्स कार्यालय
? ०७१२-२५३३६४९
? ९९६०३४६५२८ (श्री. भांगे)
नंदनवन कार्यालय
? ९९२३०९६७७९ (श्री. सोनवणे)
⚠️ महत्त्वाची सूचना
ज्या दांपत्यांचा अथवा ज्येष्ठ नागरिकांचा मागील वर्षी संस्थेतर्फे आधीच सत्कार करण्यात आला आहे, त्यांनी यावर्षी पुन्हा अर्ज करू नये, अशी संस्थेतर्फे नम्र विनंती करण्यात येत आहे.
? समाजातील गुणवंत आणि आदरणीय व्यक्तिमत्त्वांच्या या गौरव सोहळ्यात अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन जवाहर विद्यार्थी गृह संस्थेतर्फे करण्यात येत आहे. ?
