वधु - वर फॉर्म

संताजी महाराज पालखीसोबत चालणे... एक आनंद सोहळा..!

16 July 2026 sant santaji maharaj jagnade 13 views

हरवून जावे असे दृश्य...
तल्लीन व्हावा असा विठ्ठल नामाचा गजर...
आणि मिळणारा परमोच्च आनंद...
अत्यूच्च कोटीचे समाधान...
सुख-दुःखाच्या पलीकडचे जग...


आज ज्ञानेश्वर माऊलीची आणि श्री संत जगनाडे महाराजांची पालखी सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करताच भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

Sataryat Sant Jaganade Maharaj Palkhiche Bhaktimay Swagat

या पालखीचे स्वागत श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, सातारा (महाराष्ट्र) यांच्या वतीने पाडेगाव येथे अत्यंत उत्स्फूर्तपणे करण्यात आले.

संताजी महाराज पालखीसोबत चालणे म्हणजे एक आनंद सोहळा आहे...
एक आनंद पर्वणी आहे...

हरवून जावे असे दृश्य...
तल्लीन व्हावा असा विठ्ठल नामाचा गजर...

Sant Jaganade Maharaj Palkhi Sobatcha Avismaraniya Anand Sohala

आयुष्यातले जे काही मौल्यवान क्षण असतात, जे कायम जपून ठेवावेसे वाटतात... तो हाच क्षण आहे.


या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी तसेच वारकरी बांधव यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

आज लोणंद परिसरामध्ये ऑक्टोबर महिन्यात जाणवावी इतकी तीव्र उष्णता होती. मात्र या प्रखर उन्हाची कोणतीही तमा न बाळगता सर्व वारकरी बांधव विठ्ठल नामाचा अखंड गजर करत संताजी महाराजांच्या पालखीसोबत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत होते.

त्यांचा जोश, त्यांचा उत्साह आणि विठ्ठलावरील नितांत श्रद्धा पाहून प्रत्येक वारकऱ्यांप्रती नतमस्तक व्हावेसे वाटले.


या वारकऱ्यांना आम्ही काय देणार...?

विठ्ठल नामाचा गजर आणि विठ्ठलाची आस त्यांच्या हृदयात असल्यामुळे त्यांच्या इतका श्रीमंत या जगात दुसरा कोणीच नाही.

परंतु आमचे कर्तव्य आहे... देहभान विसरून चालणाऱ्या या वारकऱ्यांच्या मुखी दोन घास घालणे आणि त्यांच्या हातात पाण्याचा एक घोट देणे.

आम्ही आमचे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला.

संताजी महाराजांच्या चरणी या वारकऱ्यांसाठी अल्पोपहार व पाण्याची व्यवस्था करून आम्ही विनम्रपणे नतमस्तक झालो. सर्वांच्या गाठीभेटी घेतल्या, संताजी महाराजांच्या पालखीला हार व पुष्प अर्पण केले आणि पालखी पुढील प्रवासासाठी लोणंदच्या दिशेने प्रयाण करू लागली.


आज पदाधिकारी व समाजबांधवांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

त्यांचा उत्साह आणि संताजी महाराजांप्रती असलेले प्रेम पाहता...

"हा देखावा... हेचि देही, हेचि डोळा...!"

असेच क्षणभर थांबून पाहत राहावे, अशी प्रत्येकाच्या मनात भावना निर्माण होत होती.


आपला,

राम पडगे,  अध्यक्ष,  श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, सातारा (महाराष्ट्र)

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri Sant Santaji Maharaj jagnade Punyathii amravati teli samaj