Bride / Groom Form

FDA चा सुट्या तेल विक्री बंदीचा निर्णय हा कॉर्पोरेट धार्जिणा

26 August 2026 sant santaji maharaj jagnade 121 views

 छोट्या व्यापाऱ्यांना संपवण्याचा डाव - तेली सेना आक्रमक

     पुणे, दि. 24 ऑगस्ट 2026 : अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सुट्या खाद्यतेल विक्रीवर घातलेली बंदी तात्काळ उठवली नाही तर येत्या 1 सप्टेंबरपासून तेली सेना राज्यव्यापी "तेल बंद - व्यवसाय बंद" आंदोलन करेल, असा आक्रमक इशारा तेली सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी आज पुणे येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

    पवार म्हणाले, "हा निर्णय आरोग्याच्या नावाखाली मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना फायदा पोहचवण्यासाठी घेतला आहे. पॅकबंद तेलाच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट होणार आहे."

FDA Cha Sutya Tel Vikri Bandicha Nirnay Ha Corporate Dharjina – Chotya Vyaparyanna Sampavnyacha Dav – Teli Sena Aakramak

    या बंदीमुळे होणारे दुष्परिणाम :

1.  गोरगरिबांवर भार : 20 रुपयांचे सुटे तेल घेणाऱ्या मजुराला आता 150 रुपयांचा पाऊच घ्यावा लागेल.

2.  भेसळ वाढणार : बंदीमुळे काळाबाजार वाढून भेसळयुक्त तेल विक्रीला प्रोत्साहन मिळेल.

3.  पारंपारिक घाणे बंद पडणार : लाकडी घाण्यावर शुद्ध तेल काढणारे शेकडो तेली बांधव बेरोजगार होतील.

4.  शेतकऱ्यांचे नुकसान : स्थानिक पातळीवर तेलबियांना भाव मिळणार नाही.

तेली सेनेची ठाम भूमिका :

    सरकारने आरोग्याची काळजी असेल तर परवाना,लॅब टेस्टिंग आणि गुणवत्ता प्रमाणपत्र सक्तीचे करावे.पण सरसकट व्यवसायच बंद करणे हा उपाय नाही. 

    शासनाने तातडीने तेली समाज, व्यापारी आणि घाणे चालक यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढावा. अन्यथा तेली सेना मंत्रालयावर हजारो घाणे घेऊन धडक मोर्चा काढेल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तेली समाज मतदानातून आपली ताकद दाखवेल.

गणेश पवार - संस्थापक अध्यक्ष तेली सेना,महाराष्ट्र - 9922234621

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Aali Bhakta Shrestha Shri Sant Santaji maharaj jagnade Marg Naamkaran