धुळे जिल्हा तिळवण तेली समाज आयोजित राज्यस्तरीय वधू - वर परिचय मेळावा
विवाह हा प्रत्येक कुटुंबासाठी आनंदाचा तसेच तितकाच जबाबदारीचा क्षण असतो. आपल्या मुला-मुलींसाठी योग्य आणि अनुरूप जोडीदार शोधताना अनेक कुटुंबांना बरीच कसरत करावी लागते, वेळ जातो आणि मनस्तापही सहन करावा लागतो. याच गरजेतून धुळे जिल्हा तिळवण तेली समाजाने समाजबांधवांसाठी एक हक्काचे आणि विश्वासार्ह व्यासपीठ उभे करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचाच एक भाग म्हणून राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा-२०२६ आयोजित करण्यात येत आहे.
समाजातील वधू आणि वर एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन एकमेकांशी थेट संवाद साधतील, आपल्या अपेक्षा मोकळेपणाने मांडतील आणि याच मेळाव्यातून अनेक घरांत आनंदाचे क्षण फुलतील अशी समाजबांधवांना आशा आहे. समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक, पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्ते यांच्या एकत्रित मेहनतीतून साकारलेला हा उपक्रम केवळ धुळे जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभरातील समाजबांधवांना एकत्र आणणार आहे. मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहून आपल्या पाल्यांसाठी योग्य जोडीदार शोधण्याची आणि त्याचबरोबर समाजातील एकोपा, स्नेह व सहकार्य वाढवण्याची ही एक सुवर्णसंधी असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात येत आहे.
मेळाव्याची ठळक माहिती
फॉर्म पाठविण्यासंबंधी सविस्तर सूचना
समाज बांधवांनी फॉर्म भरून पाठवताना पुढील बाबींची काळजीपूर्वक नोंद घ्यावी, जेणेकरून कोणतीही अडचण उद्भवणार नाही.
-
फॉर्म कुठे व कधी सादर करावा
इच्छुक वधू-वरांच्या पालकांनी अथवा उमेदवारांनी स्वतः भरलेला फॉर्म तेली पंचायत भुवन, ग. नं. २, धुळे या कार्यालयातच सादर करावा. कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली असून याच कालावधीत फॉर्म स्विकारले जातील.
-
नोंदणी शुल्क कसे पाठवावे
फॉर्मसोबत रु. ५००/- (रुपये पाचशे मात्र) रोख, मनिऑर्डर, डिमांड ड्राफ्ट किंवा धनादेश हा धुळे जिल्हा तिळवण तेली समाज, धुळे या नावानेच पाठवावा. रोख रक्कम पाकिटात घालून पाठवू नये — वाटेत गहाळ झाल्यास त्याची जबाबदारी मेळावा समिती घेणार नाही.
-
ऑनलाईन पद्धतीने पैसे भरण्याची सोय
फॉर्मची अथवा जाहिरातीची रक्कम Phone Pay, Google Pay, Paytm किंवा इतर कोणत्याही UPI ॲपद्वारे फॉर्मवर छापलेला QR कोड स्कॅन करून सहजपणे भरता येते.
-
ऑनलाईन पेमेंटनंतर पाठवायची माहिती
UPI द्वारे पैसे ट्रान्सफर केल्यानंतर त्याचा Transaction ID व Screenshot, तसेच ज्या वधू अथवा वराच्या नावे फॉर्म फी भरलेली असेल त्या वधू/वराचे नाव त्याच Screenshot मध्ये लिहून ते ९१८५२५२६०१ या मोबाईल क्रमांकावर पाठवावे. सोबत कोणत्या क्रमांकावरून पैसे पाठवले तोही क्रमांक कळवावा. असे न केल्यास फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
-
NEFT / RTGS द्वारे भरणा करणाऱ्यांसाठी
Dhule Jilha Tilwan Teli Samaj, Dhule या नावाने,
Jalgaon Janata Sahakari Bank Ltd., Dhule Cityया बँकेच्या Current A/c. No.05021003196, IFSCJJSB0000006या खात्यावर रक्कम जमा करावी. फॉर्मसोबत UTR क्रमांक व NEFT केल्याची झेरॉक्स पावती जोडणे आवश्यक असून, ती जोडल्यानंतरच वधू/वर क्रमांक देण्यात येईल. -
फॉर्म पोहोचल्याची पावती
फॉर्म प्रत्यक्ष येऊन दिल्यास किंवा पोस्ट/कुरियरद्वारे पाठविल्यास, तो पोहोचल्याची पावती आपल्या संपर्कातील मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे पाठविण्यात येईल. मेळावा पूर्ण होईपर्यंत हा मेसेज डिलीट करू नये.
-
फोटोबाबत सूचना
फॉर्मसोबत 4X6 इंच पोस्ट कार्ड साईजचा एक रंगीत फोटो जोडावा. फोटोच्या मागील बाजूस नाव व गाव जेल पेनने स्पष्ट लिहून फोटो टाचणीने (स्टेपल करून) जोडावा, चिकटवू नये.
-
पुस्तिका मिळण्याबाबत नियम
शुल्क भरल्यानंतर वधू-वर क्रमांकाची पावती दिली जाईल. हीच मूळ पावती सादर केल्याशिवाय परिचय पुस्तिका दिली जाणार नाही. व्हॉट्सॲप अथवा मोबाईलवरील पावती ग्राह्य धरली जाणार नाही, तसेच नातेवाईकांच्या फोनवरूनही पुस्तिका दिली जाणार नाही.
-
माहिती सुस्पष्ट असावी
फॉर्ममधील शिक्षण, मोबाईल क्रमांक, पिनकोड तसेच इतर सर्व तपशील स्पष्ट अक्षरात भरावा. फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड टाळावी.
-
फॉर्मची प्रत जपून ठेवा
फॉर्म पाठविण्यापूर्वी त्याची एक झेरॉक्स प्रत आपल्याजवळ ठेवावी. रविवारी व सार्वजनिक सुटीच्या दिवशीदेखील फॉर्म स्विकारले जातील.
-
दुरुस्तीस वाव नाही
फॉर्म काळजीपूर्वक व व्यवस्थित भरावा. एकदा पाठविल्यानंतर त्यात कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही, तसेच जोडलेला फोटोही बदलून दिला जाणार नाही.
-
अंतिम मुदत
फॉर्म स्विकारण्याची अंतिम तारीख ३१/१०/२०२६ ही असून, या तारखेनंतर कोणताही फॉर्म स्विकारला जाणार नाही.
जाहिरातीसाठी कळकळीचे आवाहन
मेळाव्यात नोंदणी केलेल्या वधू-वरांचा परिचय असलेली आकर्षक व देखणी पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे. या पुस्तिकेत जाहिरात दिल्यास आपल्या व्यवसायाचा परिचय संपूर्ण महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेरही पोहोचेल आणि आपला व्यवसाय वाढण्यास मदत होईल. सोबतच समाजकार्यालाही आपला हातभार लागेल, असे कळकळीचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.
टीप : जाहिरात स्वतः बनवून पाठविणार असाल तर ती पीडीएफ अथवा सीडीआर फॉरमॅटमध्ये असावी. पूर्ण पानाचा आकार 19 X 24 सेमी तर अर्ध्या पानाचा आकार 12 X 19 सेमी इतका असावा. तयार जाहिरात dhulejilhatelisamaj@gmail.com या ईमेलवर पाठवता येईल.
राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा समिती २०२६
पदाधिकारी व समिती सदस्य
- श्री. युवराज (सनीदादा) लक्ष्मण चौधरी — अध्यक्ष
- श्री. भटुबापू संतोष चौधरी — कार्याध्यक्ष
- श्री. रितेश (भाऊ) दत्तात्रय चौधरी — स्वागताध्यक्ष
- श्री. मिलींद (भाऊ) रविंद्र चौधरी — स्वागताध्यक्ष
- श्री. रोहित (बंटी भाऊ) सुभाष चौधरी — उपाध्यक्ष
- श्री. अतिष (भाऊ) प्रल्हाद चौधरी — सचिव
- श्री. गिरीश (भाऊ) गुलाबराव चौधरी — खजिनदार
सदस्य
जेष्ठ मार्गदर्शक
मेळाव्याला वेळोवेळी मार्गदर्शन व पाठबळ देणारे समाजातील ज्येष्ठ व अनुभवी मान्यवर
- श्री. भगवानबापूजी रामभाऊ करनकाळ — प्रथम महापौर, म.न.पा. धुळे; जिल्हाध्यक्ष, धुळे जिल्हा तिळवण तेली समाज
- श्री. युवराजभाऊ महाद चौधरी — अध्यक्ष, तेली पंचायत, धुळे
- श्री. रामेश्वरबापू धोंडू चौधरी — सेक्रेटरी, तेली पंचायत, धुळे
- श्री. सतिषतात्या दिगंबर महाले — शिवसेना जिल्हाप्रमुख, शिंदे गट
- श्री. कमलाकर रघुनाथ अहिरराव — अध्यक्ष, गुरुशिष्य स्मारक समिती, धुळे
- श्री. मिलींदभाऊ रवींद्र चौधरी — जिल्हाध्यक्ष, तेली समाज युवक मंडळ
- सौ. कल्पनाकाकू सुनिल महाले — माजी महापौर तथा नगरसेविका, म.न.पा. धुळे
- श्री. महादूकाका अंबर चौधरी — जिल्हाध्यक्ष, तंटामुक्ती समिती
- श्री. युवराज किसनराव करनकाळ — जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी, धुळे
- श्री. संदीपतात्या दत्तात्रय महाले — माजी शिक्षण सभापती, मनपा, धुळे
- श्री. नरेशआप्पा रुपला चौधरी — नगरसेवक, म.न.पा. धुळे
- श्री. आतिष प्रल्हाद चौधरी — शहराध्यक्ष, तेली समाज युवक मंडळ
- सौ. जयश्री कमलाकर अहिरराव — माजी महापौर तथा नगरसेविका, म.न.पा. धुळे
- सौ. सुमन पितांबर महाले — जिल्हाध्यक्षा, महिला मंडळ, धुळे
- श्री. सुनिलकाका शामराव महाले — माजी नगरसेवक, मनपा, धुळे
- श्री. कैलास छगनराव थोरात — माजी सरपंच, अजंग ग्रामपंचायत
- श्री. भटुबापू संतोष चौधरी — माजी सरपंच, वलवाडी ग्रामपंचायत
- श्री. गजानन रामदास चौधरी — ज्येष्ठ मार्गदर्शक, तेली समाज, धुळे
- सौ. प्रतिभा शिवाजीराव चौधरी — माजी महापौर तथा नगरसेविका, म.न.पा. धुळे
- सौ. गिता रामेश्वर चौधरी — शहराध्यक्षा, महिला मंडळ, धुळे
- श्री. राजेंद्रनाना दत्तात्रय महाले — अध्यक्ष, पांझरापोळ गोशाळा संस्था
- श्री. युवराज (सनीदादा) लक्ष्मण चौधरी — अध्यक्ष, वधु वर परिचय मेळावा समिती
- श्री. निळकंठ शिवदास चौधरी — ज्येष्ठ मार्गदर्शक, तेली समाज, धुळे
- श्री. संदीप शिवदास चौधरी — समाजसेवक, तेली समाज, धुळे
सहकार्यशील समाजबांधव
मेळाव्याच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणारे धुळे जिल्हा व परिसरातील समाजबांधव
विनीत — सहयोगी संस्था व मंडळे
या मेळाव्यास पाठबळ देणाऱ्या धुळे परिसरातील संस्था व सामाजिक मंडळे
- धुळे जिल्हा तिळवण तेली समाज पंच मंडळ, धुळे
- धुळे जिल्हा तिळवण तेली समाज तंटामुक्ती समिती, धुळे
- धुळे जिल्हा तिळवण तेली समाज महिला मंडळ, धुळे
- धुळे जिल्हा तिळवण तेली समाज युवक मंडळ, धुळे
- श्री संताजी शिक्षण संस्था, पारोळा रोड, धुळे
- संतश्री संताजी तेली बहुउद्देशीय मंडळ, देवपूर, धुळे
- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सर्व आघाडी
- धुळे महानगर तेली समाज पंचायत मंडळ, धुळे
- धुळे महानगर तेली समाज तंटामुक्ती समिती, धुळे
- धुळे महानगर तेली समाज महिला मंडळ, धुळे
- धुळे महानगर तेली समाज युवक मंडळ, धुळे
- श्री संताजी तेली युवक मंडळ, धुळे
- प्रदेश तेली महासंघ, धुळे जिल्हा व खान्देश तेली समाज मंडळ, धुळे
- श्री संताजी जगनाडे महाराज उन्नती मंडळ, मार्केट यार्ड परिसर, धुळे
