जळगाव जिल्हा तेली समाजाचा भव्य वधू - वर परिचय मेळावा २९ नोव्हेंबरला
तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळ व महासभेच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळ आणि जळगाव जिल्हा तेली समाज महासभा, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२६ रोजी राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. समाजातील विवाहेच्छुक तरुण-तरुणींसाठी योग्य जोडीदार मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा मेळावा जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील तेली समाजबांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण व सुवर्णसंधी ठरणार आहे.
मेळाव्याचे ठिकाण व स्वरूप
हा मेळावा लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. लिलाताई सुरेश चौधरी नगर, मॉर्डन गर्ल्स हायस्कूल, स्टेट बँक मुख्य शाखेजवळ, जळगाव येथे संपन्न होणार आहे. मेळाव्यासाठी नोंदणी शुल्क रु. ५००/- इतके निश्चित करण्यात आले असून, आयोजकांनी सुव्यवस्थित नियोजनाच्या दृष्टीने काटेकोर नियमावली जाहीर केली आहे.
नोंदणी प्रक्रियेबाबत महत्त्वाच्या सूचना
परिचय पुस्तिकेसाठी वधू-वरांची माहिती भरलेल्या फॉर्मसोबत रु. ५००/- (पाचशे) रोख, समक्ष अथवा डी.डी. द्वारे "जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव" या नावाने पाठवणे आवश्यक आहे. चेक पाठवू नये तसेच पाकिटातून रोख रक्कम पाठवू नये, असे स्पष्ट आवाहन आयोजकांनी केले असून, असे पैसे गहाळ झाल्यास त्याची जबाबदारी मेळावा समिती स्वीकारणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
फॉर्म स्वीकारण्याची अंतिम मुदत दि. १२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत असून, त्यानंतर प्राप्त होणारे फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. फॉर्म प्रत्यक्ष जमा केल्यास पोहोच पावती घेणे आवश्यक असून, टपालाद्वारे पाठवलेल्या फॉर्मची पोहोच डी.डी.सह पत्राद्वारे कळवली जाईल. फॉर्मसोबत छायाचित्र जोडणे अनिवार्य असून, फोटोशिवाय फॉर्म स्वीकारला जाणार नाही, याची विशेष नोंद घ्यावी.
फॉर्मचे शुल्क जमा झाल्यानंतर तात्काळ पावती देण्यात येईल आणि ही पावती सादर केल्याशिवाय सूची पुस्तिका दिली जाणार नाही, असेही आयोजकांनी नमूद केले आहे. फॉर्म भरून झाल्यावर त्याची झेरॉक्स प्रत स्वतःकडे जपून ठेवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. फॉर्म सुवाच्च व सुंदर अक्षरात भरून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत निर्धारित ठिकाणी जमा करावा, अशी सूचना देण्यात आली आहे.
फॉर्म स्वीकारण्याचे ठिकाण
फॉर्म स्वीकारण्याची व्यवस्था तेली समाज मंगल कार्यालय, ढाके कॉलनी, प्रताप नगर, गणेश कॉलनी रोड, जळगाव येथे करण्यात आली असून, सकाळी १० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत फॉर्म स्वीकारले जातील. विशेष बाब म्हणजे रविवार व सुट्टीच्या दिवशीदेखील फॉर्म स्वीकारले जाणार आहेत, ही नोंद घेण्याजोगी बाब आहे.
जाहिरात दरपत्रक
इच्छुक व्यावसायिकांसाठी परिचय पुस्तिकेच्या आतील पानावर जाहिरात देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. पूर्ण पान जाहिरातीसाठी (१८ x २५ सेमी आकाराची) रु. ६,०००/- तर अर्धे पान जाहिरातीसाठी (१८ x १२ सेमी आकाराची) रु. ३,०००/- असे दर निश्चित करण्यात आले आहेत.
मंडप व चहापानाचे दातृत्व
या मेळाव्यासाठी नगराचे (मंडपाचे) दातृत्व उद्योगपती व धरणगावचे माजी नगराध्यक्ष मा. श्री. नानासो सुरेश सिताराम चौधरी तसेच धरणगाव नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. लिलाताई सुरेश चौधरी यांनी स्वीकारले आहे. तर चहापानाची संपूर्ण व्यवस्था विजयदीप ज्वेलर्स, जळगाव-चाळीसगाव-सावदा यांचे मा. श्री. भाऊसो दिलीप सिताराम चौधरी व मा. श्री. भाऊसो विजय सिताराम चौधरी यांच्याकडून करण्यात येणार आहे.
जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी
या भव्य मेळाव्याच्या आयोजनामागे जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकारी व विश्वस्तांचे मोठे परिश्रम आहेत. यामध्ये अध्यक्ष सुरेश हरदास चौधरी (चाळीसगाव, मो. 9422276647), उपाध्यक्ष सुरेश सिताराम चौधरी (धरणगाव, मो. 9422278899), उपाध्यक्ष संतोष सोनू चौधरी (जळगाव, मो. 9423617777), सहसचिव देवेंद्र रामदास गांगुर्डे (जळगाव, मो. 8888601677) यांचा समावेश आहे.
तसेच विश्वस्त बाळासाहेब उखा चौधरी (चाळीसगाव, मो. 7499409177), विश्वस्त प्रताप हरी चौधरी (जळगाव), विश्वस्त विजय शांताराम चौधरी (भडगाव, मो. 9423159450), विश्वस्त लोटन जगन्नाथ चौधरी (मारवड, मो. 9404058988), विश्वस्त चंद्रकांत पांडुरंग चौधरी (रावेर, मो. 9922781792), विश्वस्त मनोज बापू चौधरी (जळगाव, मो. 9960117177), मानद सदस्य गजानन शिवदास चौधरी (अमळगाव, मो. 8411964401), सचिव नारायण दयाराम चौधरी (पाचोरा, मो. 7972903775), उपाध्यक्ष राजेंद्र दोधु चौधरी (एरंडोल, मो. 7264832666), सहसचिव गणेश गोबाजी चौधरी (जळगाव, मो. 7841969698) यांचाही सक्रिय सहभाग आहे.
याशिवाय विश्वस्त वामन पांडू चौधरी (पारोळा, मो. 9404713903), विश्वस्त एकनाथ माधव चौधरी (अमळनेर, मो. 9970419483), विश्वस्त पुंडलीक माधव जावरे (नायगाव, मो. 9767509505), विश्वस्त सतीश भालचंद्र चौधरी (बोरनार, मो. 9405739117), विश्वस्त दिलीप पंडीत चौधरी (बहादरपूर, मो. 9970729343), विश्वस्त श्रीमती लिना महेश चौधरी (जळगाव, मो. 8177887777), मानद सदस्य बाबूलाल निंबा पवार (चाळीसगाव, मो. 9420382591), मानद सदस्य भास्कर बाबूलाल चौधरी (कासोदा, मो. 9834729272) आणि मानद सदस्य दुर्गेश विश्वनाथ चौधरी (जळगाव, मो. 7507777704) यांचेही मोलाचे योगदान या आयोजनामागे आहे.
जळगाव जिल्हा तेली समाज महासभेचे पदाधिकारी
जळगाव जिल्हा तेली समाज महासभा, जळगावतर्फे अध्यक्ष सुरेश सिताराम चौधरी (धरणगाव, मो. 9422278899) यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी सक्रिय आहेत. यामध्ये सतिष नारायण चौधरी (पाचोरा, मो. 9860477699), विठ्ठल गोविंदा चौधरी (भडगाव, मो. 9860547384), राहुल महेश चौधरी (जळगाव, मो. 7248977677), विजय मधुकर चौधरी (जळगाव, मो. 9423618888), पांडुरंग महिपत चौधरी (जळगाव, मो. 9423614040), डॉ. मणिलाल दौलत चौधरी (जळगाव, मो. 8087257377), रघुनाथ नथ्थू चौधरी (गुढे, मो. 7588614780), रविंद्र एकनाथ चौधरी (जळगाव, मो. 9370406740), संजय वामन चौधरी (कासोदा, मो. 9960142230) आणि वासुदेव हिलाल चौधरी (कळमसरा, मो. 7588813672) यांचा समावेश आहे.
तसेच उदय शांतराम चौधरी (जळगाव, मो. 9372031747), रोहित भानूदास चौधरी (शेंदुर्णी, मो. 9975694756), सचिव नारायण दयाराम चौधरी (पाचोरा, मो. 7972903775), दिलीप बाबूराव चौधरी (जळगाव, मो. 8421377616), उमेश शंकर चौधरी (जळगाव, मो. 9881771771), दिलीप रामराव चौधरी (चाळीसगाव, मो. 9422276580), राजेंद्र लक्ष्मण पवार (शेंदुर्णी, मो. 9421518502), अमृत भगवान चौधरी (लोहारा, मो. 9881256574), भिकन त्रंबक चौधरी (चाळीसगाव, मो. 9422276699) यांचाही सक्रिय सहभाग आहे.
याखेरीज भागवत मोहन रावते (साकळी, मो. 8806035808), आबा भिका महाले (धरणगाव, मो. 9399925006), सुरेश गिरधर चौधरी (चाळीसगाव, मो. 9890711721), नेताजी राजाराम पाटील (जळगाव, मो. 9420790125), राजेंद्र काशिनाथ चौधरी (चाळीसगाव, मो. 9422780299), प्रकाश शंकर चौधरी (चोपडा, मो. 9371198889), वासुदेव बाबुराव चौधरी (जळगाव, मो. 9423487441), प्रमोद मधुकर चौधरी (पिंप्री, मो. 9730154111), सुनिल सोमा चौधरी (जळगाव, मो. 9420787420), कैलास लोटन चौधरी (जळगाव, मो. 9766287888), मनोहर शंकर चौधरी (भडगाव, मो. 8600540155) आणि गोकुळ सोनू चौधरी (चाळीसगाव, मो. 9604677311) यांचेही मोलाचे सहकार्य या मेळाव्याच्या आयोजनास लाभले आहे.
समाजातील अधिकाधिक विवाहेच्छुक तरुण-तरुणींनी व त्यांच्या पालकांनी या संधीचा लाभ घेऊन विहित मुदतीत फॉर्म सादर करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
