वधु - वर फॉर्म

तेली समाज, वसई-विरार च्‍या वतिने संताजी पुण्‍़यतिथी साजरी

13 July 2016 sant santaji maharaj jagnade 44 views

        दिनांक ०८ जानेवारी २०१६ श्री संताजी जगनाडे महाराज ह्यांची ३१६ वी पुण्यतिथी निमित्त कोकण मराठी साहित्य परिषद, शूर्परक शाखेतर्फे शाखेचे अध्यक्ष तसेच आपल्या श्री संताजी जगनाडे सेवा मंडळ "तेली समाज", वसई-विरार-पालघर चे कार्याध्यक्ष मा. श्री. रमाकांत वाकचौडे (बापू) ह्यांनी आज त्यांच्या नालासोपारा पश्चिम सभागृहामध्ये साजरी केली, तद्वेळी सदर कार्यक्रमास को. म. सा. प., शुर्पारक शाखेचे कार्यकारिणी सदस्य व आपल्या मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. भगवान बोरसे, सचिव श्री. वैभव झगडे, सल्लागार श्री नामदे गुरुजी, श्री जाधव सर, को. म. सा. प., शुर्पारक शाखेचे सदस्य आणि मंडळाचे कार्यकारिणी सदस्य कु. आशिष रसाळ, श्री साखरकर साहेब, महिला अध्यक्षा सौ पुष्पा बोरसे, सौ सौंदळकर मामी, सौ साखरकर मॅडम हे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

     कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री भगवान बोरसे साहेब यांच्या हस्ते श्री संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करुन तसेच पुष्पगुच्छ व स्वागत स्विकारुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

       कार्यक्रमावेळी मा. श्री. जाधव सरांनी आपल्या संताजी जगनाडे महाराजांबद्दल अमूल्य व महत्वाची माहिती सर्व श्रोत्यांना सांगितली.

- श्री. संताजी जगनाडे सेवा मंडळ "तेली समाज", वसई-विरार-पालघर

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Ajmer Sahu sena sanman samaroh