वधू - वर फॉर्म

राहाता तालुका अध्यक्ष श्री. योगेश बनसोडे

01 July 2016 Teli samaj 91 views

    शिर्डी :- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा राहाता तालुका अध्यक्ष पदाची निवड शिर्डी येथे गणेश मंदिरात झाली. यावेळी निवडणुक निरिक्षक म्हणुन प्रांतिक उपाध्यक्ष श्री.करनकाळ, श्री. सुधाकर कवडे उपस्थित होती. या वेळी सर्वश्री भागवत लुटे अध्यक्ष उत्तर नगर जिल्हा, श्री. सोमनथ बनसोडे कार्याध्यक्ष उत्तर नगर जिल्हा, श्री. दत्तात्रय सोनवणे अध्यक्ष राहुरी तालुका, श्री. सदाशीव पवार, श्री. सुधाकर कवडे, जि. नाशिक असे किमान दोनशे समाज बांधव उपस्थीत होते. प्रत्येकाने सामाजीक प्रश्‍ना बाबत, पदाधीकारी कामकाजा बाबत विचार मांडले अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात निवडणुक प्रक्रिया संपन्न झाली या वेळी इचछुकांची संख्या जास्त असल्याने लहान मुलीच्या हास्ते चिठ्ठी उचलुन निवड जाहीर करण्यात आले. 1) योगेश बनसोडे अध्यक्ष, 2) श्री. बद्रीशेठ पंढरीनाथ लोखंडे, कार्याध्यक्ष, 3) राजेंद्र जगताप उपाध्यक्ष  4) नंदकिशोर धोंडीराम लुटे, 5) अमित अनिल बनसोडे, युवा अध्यक्ष. निवड झालेल्या पदाधीकार्‍यांचा जिल्हा अध्यक्षांच्या वतीने उचित सन्मान करण्यात आला. या वेळी एकच खंत जाणवली समाजाची एक ही महिला या ठिकाणी उपस्थीत नव्हती. निदान उत्तर नगर जिल्हा अध्यक्षा तरी उपस्थीत असणे गरजेचे होते. महिलांचे संघटन झाल्या शिवाय संघटन पुर्ण होणार नाही.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

tilvan teli samaj lakdi teli ghana