वधू - वर फॉर्म

बनावट ओबीसींचे दाखले सादर करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा.

02 July 2016 O.B.C. 102 views

Ramesh Bhoj     पुणे - खोटी कागदपत्रे व प्रतिज्ञापत्र शासनास सादर करूण बनावट ओबीसींनी मिळविलेले दाखले तात्काळ रद्द करूण, खोटे कागदपत्र व प्रतिज्ञापत्रक दाखल करणारे बनावट ओबीसींचे वर तात्काळ फौजारी दावे दाखल करूण त्यांच्यावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे. असे विचार ओबीसी सेवा संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश भोज यांनी कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरांमध्ये मांडले.  ओबीसी सेवा संघाचे पुणे जिल्हा कार्यकर्ता शिबीर पुणे येथे नुकतेच पार पडले. याप्रसंगी खर्‍या ओबीसींवर होणारा अन्याय या विषयांवर चर्चा करण्यात आली. खोटे ओबीसींचे दाखले मिळवुन तिकीटे मिळवुन निवडुन येतात अणि त्यातच खर्‍या ओबीसी असणार्‍या उमेदवारावर अन्याय होतो. ओबीसी समाज हा मध्यमवर्गीय असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या मागासलेला असुन त्यामुळे सक्षम असणार्‍या उमेदवाराला टक्कर देवु शकत नाही. या प्रसंगी ओबीसी सेवा संघाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मोहन देशमाने पुणे  जिल्हा काया्रध्यक्ष संदिप थोरात युवा अध्यक्ष विशाल सुपेकर, दिलीप शिंदे, महेंद्र शेलार, लक्ष्मण कावडे, पंडीत चौधरी पुणे शहर अध्यक्ष, चंद्रकांत शिंदे, महिला आघाडी पुणे शहर अध्यक्ष सौ. रेखाताई रासकर, व अनेक कार्यकर्ते हजर होते. या प्रसंगी ओबीसी सेवा संघाच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन ही मोहन देशमाने यांचे हस्ते करण्यात आले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Beed gunvant vidyarthi satkar by Jaydutt Kshirsagar