वधू - वर फॉर्म

कल्याण तेली समाजा ची संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्‍या पुण्यतिथी निमित्त दर्शन सहल..।

24 January 2017 sant santaji maharaj jagnade 116 views

कल्याण:-संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३२८ वी पुण्यतिथी निमित्त दर्शन सहल..।
             मु. सुदूंबरे येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ठाणे विभागाचे अध्यक्ष श्री सुनिल चौधरी सचिव श्री सतिश चौधरी,मुकूंद चौधरी यांचे नेतृत्वाखाली समस्त समाजिक कार्यकर्ते कल्याण तेली समाज पश्चिम चे अध्यक्ष श्री मुकुंद चौधरी खजिनदार श्री अरुण ढगे समस्त कार्यकारिणी सदस्य व ठाणे जिल्हा साहू तेली समाज कल्याण चे श्री मनोज बाबुराम गुप्ता महिला मंडल असे ५२ सामाजिक कार्यकर्त्यासह प्रथम महड येथून "श्री गणेश दर्शना" ने सुरुवात करण्यात आली.काही दर्शनीय स्थल - संत शिरोमणी जगदगुरू तुकाराम महाराजांचा भंडारा डोगर - सुदूंबरे येथे समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज समाधी दर्शन व महाप्रसाद- गाथा मंदिर - प्रति शिर्डी मंदिर - श्री नारायणी धाम मंदिर दर्शन व श्री समाजाचे युवा कार्यकर्ते श्री निखिल होगले यांच्या पुढाकाराने आयोजित खंडाळा येथील एका रम्य बंगल्यावर रात्रीचे जेवणानंतर कल्याण तेली समाज कार्यालय येथे सहलीची सांगता करण्यात आली..!
सुदूंबरे संस्थानाचे सर्व पदाधिकारी,श्री निखील होगले व सर्व सभासदांनी सहकार्य केल्याबद्दल कल्याण तेली समाजा तर्फे त्यांचेआभार..

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराज संक्षिप्त परिचय | Sant Santaji Jagnade Maharaj Jivanpat