वधू - वर फॉर्म

पाचोरा तालुका तेली समाज

16 March 2017 Teli samaj 153 views

                  लोहारा ता.पाचोरा प्रतिनिधी --- पाचोरा तालुका तेली समाजा तर्फे नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत तेली समाजाच्या लोहारा-कळमसरा पंचायत समिती गणातून भाजपाच्या सौ. अनिता कैलास चौधरी यांचा विजयी झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी पाचोरा तालुकाध्यक्ष भोलाआप्पा चौधरी, जिल्हा सचिव नारायण चौधरी, पाचोरा शहराध्यक्ष बापूराव चौधरी आदींनी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ.अनिता चौधरी व ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी यांचा शाल,श्रीफळ,व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्तविक भोला आप्पा यांनी केले.तर आभार कैलास चौधरी यांनी मानले व समाजाचा सत्कार हा सर्वश्रेष्ठ सत्कार असून सदैव समाजाचा ऋणी राहील असे सांगितले. तालुका उपाध्यक्ष अमृत चौधरी, यावेळी मोतीलाल चौधरी, आर.के. चौधरी, शिवाजी चौधरी, रघुनाथ चौधरी, भालचंद्र चौधरी, नाना चौधरी , शरद चौधरी,, पत्रकार दिपक पवार, दिलीप चौधरी, नाना चौधरी, प्रवीण चौधरी  निलेश चौधरी, प्रल्हाद चौधरी, प्रताप चौधरी, सुभाष चौधरी, योगेश चौधरी, प्रकाश चौधरी आदी उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस … शाहिर संभाजी भगत