वधु - वर फॉर्म

जळगाव तेली समाजाचे विजय चौधरी महाराष्ट्र केसरी.

29 December 2014 Other 52 views
       अहमदनगर - कुस्‍ती क्षेत्रात मानाचा समजला जाणारा महाराष्‍ट्र केसरी हा पुरस्‍कार तेली समाजातील विजय चौधरी यांनी पटकवला. आता पर्यत महाराष्‍ट्र केसरमध्‍ये पश्चिम महाराष्‍ट्र व मंबईचा वरचष्‍मा होता. परंतु या परंपरेला मोडीत काढत जळगाव तेली समाजाचे विजय चौधरी महाराष्ट्र केसरी बनले. Vijay Choudhary Maharashtra Kesari Teli Samaj        रविवारी अहमदनगर येथे वाडिया पार्क क्रीडा संकुलात झालेल्‍या आंतिम सामन्‍यात चालिसगांव तालुक्‍यातील सायगांव येथील विजय चौधरी नी दहा हजार कुस्‍ती प्रेमीयांच्‍या उपस्थ्तिीत आपले प्रतिस्‍पर्धी सचिन येलबरला धुळ चारत महाराष्‍ट्र केसरीचा किताब पटकावला. महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारा विजय हा ४१ वा कुस्तीपटू ठरला आहेत.       जळगावमधील लहान गावातून आलेल्या विजयच्या या विजयामुळे महाराष्ट्रातील सर्व तेली समाज बांधवांनी आनंद व्‍यक्‍त केला आहे.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi Wari sohala Aurangabad Teli Samaj