वधू - वर फॉर्म

लोणंद येथे तिळवण तेली समाजा तर्फे संताजी महाराज जगनाडे पालखीचे स्वागत.

24 July 2016 sant santaji maharaj jagnade 116 views

   सुदुंबरेहुन पंढरपूरवारी साठी श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पालखी रथाचे लोणंद येथे सातारा जिल्हा तिळवण तेली समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले व रथास फुलांची सजावट करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आली.

    यावेळी प्रांतिक तेली महासभेचे उपाध्यक्ष जयसिंगराव दळवी, रमेश गवळी, प्रवीण चांदवडकर, संदीप करपे, सुरेश चिंचकर, आनंदराव दळवी, रघुनाथ दळवी, अशोक भोज, राम पडगे, नमदेव झगडे व मान्यवर उपसिथत होते.

    पालखीच्या  रथाच्या स्वागता नंतर पालखी स्थळावर समाज बांधवांनी श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.

    दरवर्षी सातारा जिल्हा तिळवण तेली समाजाच्या वतीने पालखी रथाचे स्वागत करून पालखी रथ फुलांनी सुशोभित केला जातो, या कामी समाजबांधवों सहकार्य लाभते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Wardha teli Samaj gunvant vidyarthi satkar