वधु - वर फॉर्म

चंद्रपूर तेली समाजातर्फे मनपा प्रशासनाचा निषेध

20 December 2017 Teli samaj 49 views

        चंद्रपूर संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात लावण्यात आलेली फलक मनपा प्रशासनाने काढले. यावर आक्षेप घेण्यात आला असून मनपा प्रशासनाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक आकाश साखरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.     

             संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात शनिवार दिनांक 16 रोजी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. नागरिकांना याबाबत माहिती मिळावी म्हणून शहरात काही ठिकाणी फलक लावण्यात आले. हे फलक मनपाच्या वतीने काढण्यात आले.  या वतीने समाजाच्या वतीने तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. काही दिवसांपूर्वी शहरात भाजपाचे पदाधिकारी आमदार खासदार मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले.  सर्वोच्च न्यायालयाची सर्व नियम धाब्यावर बसवून हा प्रकार झाला.  मात्र मनपा प्रशासनाने कारवाई करण्याऐवजी याकडे डोळेझाक केली.  हा अन्याय  तेली समाजावरच का ? असा सवालही यावेळी करण्यात आला. त्याचप्रमाणे स्वच्छ शहर सुंदर शहर या नावाची गोष्ट बाजी सध्या शहरात सुरू आहे. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता नियमांची पायमल्ली करत हे बॅनर लावण्यात आले आहे. ज्यांच्यावर नियमांचे पालन करण्याची जबाबदारी आहे त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे.  सर्व समाजाकरिता मनपा प्रशासन सहकार्य करीत असताना नेमका तेली समाजावर हा अन्याय का ? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक आकाश साखरकर यांच्यासह अनुप बेले, सोनू आगडे, गोलू तेलमासरे,आकाश चौरे,बबलू झारे यांची उपस्थिती  होती.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाची राजकीय ताकद - विदर्भातील तेली समाजाचे राजकीय वर्चस्व | Political Power of Teli Samaj