वधू - वर फॉर्म

भगूर तेली समाज संताजी महाराज जयंती उत्साहात

20 December 2017 sant santaji maharaj jagnade 124 views

       नाशिक भगूर तेली समाज -  भगूर येथील शिवाजी चौकात जय संताजी युवा फाउंडेशन च्या वतीने श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती सोहळा उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमासह साजरा करण्यात आला. संताजी युवा फौंडेशनचे अध्यक्ष व सभासदांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच सायंकाळी पालखी पूजन नगराध्यक्षा अनिता करंजकर यांच्या हस्ते करण्यात आले.

        उपनगराध्यक्ष मनीषा कस्तुरे भूगोल शिवसेना शहर प्रमुख आंबादास कस्तुरे नगरसेविका शोभा भागवत माजी प्राचार्य रामदास आंबेकर नगरसेवक संजय शिंदे सुदाम वालझाडे संगीता पिंपळे भगूर शहराध्यक्ष मनोहर आंबेकर उपाध्यक्ष सचिन दुरगुडे अनिल कस्तुरे, प्रमोद आंबेकर, पांडुरंग आंबेकर, प्रदीप कस्तुरे, संदीप वालझाडे, राजेंद्र आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

            शहरातील चौकाचौकातून पालखीचे पूजन व स्वागत केले.  महिला वर्गासह पुरुषांनीही फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. भजन व भावगीतांनी सर्व मंत्रमुग्ध झाले.  याप्रसंगी संताजी जगनाडे महाराज यांच्या विषयी मार्गदर्शन करताना महाराजांच्या कार्याचा आढावा विशद केला. यावेळी महाराजांच्या जयघोषांनी शिवाजी चौक दणाणून निघाला होता. रामदास आंबेकर अंबादास कस्तुरी मनोहर आंबेकर सचीन दुर्गुडे  आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर वाघचौरे संदीप खरे पवन आंबेकर रामेश्वर आंबेकर परेश वालझाडे प्रवीण कस्तुरे विनय वालझाडे श्याम वालझाडे रूपेश वालझाडे आदी समाजबांधव व संताजी युवा फाउंडेशन ची कार्यकर्ते उपस्थित होते. सचीन दुर्गुडे यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद आंबेकर यांनी सूत्रसंचालन केले.  संदीप गोरे यांनी आभार मानले

nashik Bhagur teli samaj sant santaji maharaj punyatithi

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Mahasamund Sahu Samaj pratibha samman samaroh