वधू - वर फॉर्म

 संताजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शोभायात्रा खेडगांव दिंडोरी तेली समाज

28 December 2017 sant santaji maharaj jagnade 94 views

    संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने येथील युवक प्रतिष्ठाण व संताजी महिला मंडळ यांच्या वतीने गावातून शोभायात्रा काढण्यात आली.

    सकाळी संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिक सुरेश सोनवणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तेली गल्ली येथून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत महिला मंडळाच्या वतीने पैठणी वेशभूषा करून फुगडी खेळत डोक्यावर तुळशी वृंदावन घेवून मिरवणूकीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. भक्तीगीत, भारूड, हरिपाठ व महाआरती होऊन महाप्रसादाच्या कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभम जाधव, विकी राऊत, चेतन सोनवणे, गौरव पवार, सौरभ पवार, स्वप्नील वाघ, स्वप्नील पवार आदींसह समाजबांधवांनी परिश्रम घेतले. 
 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Amravati Teli Samaj Gunvant Vidyarthi Satkar