अध्यक्ष शिवदास उबाळे यांची माहिती
पुणे जिल्ह्यातील वार्षिक विकास योजनेंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांनी श्रीक्षेत्र सुदुंबरे येथील श्रीसंत संताजी महाराज मंदिर परिसरात भक्तनिवास बांधकामाकरीता २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांनी दिली.
जळगाव - नाशिक विभागीय तैलिक महासभा अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आर. टी. अण्णा चौधरी (वय ८३) यांचे शनिवार दि. १ मे रोजी पहाटे ४ वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र तेली समाजात पोकळी निर्माण झाली.
माढा - माढा तालुक्यात लाकडी घाण्याच्या तेलाच्या उद्योगाला युवकांच्या पुढाकारामुळे गती मिळत असून लाकडी घाण्याचे तेल वापरण्याचा ट्रेंडही लोकांमध्ये वाढताना दिसून येत आहे. अभियंत्यापासून अगदी शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत या उद्योगात लोक उतरलेले आहेत.
चंद्रवदन बाबुराव चौधरी उर्फ आबासाहेब यांचे नाव ऐकताच नजरेसमोर कानुमाता व सप्तशृंगी देवीचे चित्र उभे राहते. शिरपूर येथील रहिवासी असलेले आबासाहेब यांचे धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात मोठे योगदान आहे.सप्तशृंगी माता व कानु मातेचे अनेक गाणे त्यांनी स्वतः लिहून त्याचे चित्रीकरण केले आहे.अनेक सुप्रसिद्ध गाणे व कॅसेट आबासाहेबांच्या नावावर आहेत.नुकतेच तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी, संत श्रेष्ठ संताजी जगनाडे महाराजांवर देखील त्यांनी गाण्यांचे चित्रीकरण केले आहे.
आपल्याला होणारे बहुतांश आजार, हे शरिरातील त्रिदोषांच्या असमतोलामुळे होतात. आहाराचे संतुलन बिघडण्यात रिफाईंड तेल बर्याचदा कारणीभूत ठरते. रिफाईंड तेल निर्माण करण्यासाठी ‘गॅसोलिन’, ‘सिंथेटिक’, ‘अॅन्टिऑक्सिडंट’, आदी प्रकारची रसायने उपयोगात आणली जातात. ‘रिफाईंड’ तेलाचा अजिबात वास येत नाही; कारण त्यात एकही प्रकारचे जीवनसत्त्व शेष रहात नाही. त्यातील चिकटपणाही नाहीसा झालेला असतो;