Sant Santaji Maharaj Jagnade
खान्देश तेली समाज मंडळ शहादा शहराध्यक्ष श्री उदय दगा चौधरी यांचे शिफारशीवरून मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी यांच्या आदेशाने मंडळाचे मुख्य सचिव श्री रविंद्र जयराम चौधरी यांनी पुढील नियुक्त्या शहादा शहरासाठी घोषित करून त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आले.
सध्या सणवारांचे दिवस आहेत, त्यामुळे घराघरांत तळण केले जाते. पण,गृहिणी तळण करताना चांगले तेल वापरत नसतील, तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे शक्यतो तळण्यासाठी फिल्टर्ड तेलाचा वापर करावा, त्यातही शेंगदाणा किंवा घाण्याचे तेल वापरले तर ते अतिशय चांगले ठरू शकेल, असे आहारतज्ज्ञांनी माहिती दिली.
सणासुदीमुळे तेलाची मागणी, विक्री वाढली; किंमतीही वाढल्याने ग्राहक त्रस्तनवरात्र तसेच दिवाळीमुळे घरोघरी खाद्यतेलाच्या मागणीमध्ये वाढ होते. यामुळे बाजारात पैकिंगच्या तेलासह घाण्याचे तेलही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. तळलेले पदार्थ तसेच गोड पदार्थ करण्यासाठी शक्यतो घाण्याचे तेल वापरण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे.
अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज संताजी विचार मंच अहमदनगर व प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑफिस: संताजी विचार मंच C/o. देवकर फर्निचर, नेताजी सुभाष चौक, अहमदनगर. मेळाव्याचे ठिकाण : माऊली सभागृह, माऊली संकुल, नगर-मनमाड रोड, अहमदनगर. Mob.: 9579832557
खान्देश तेली समाज मंडळाचे निदर्शनेओझर (ता. जामनेर) येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी आज खान्देश तेली समाज मंडळातर्फे निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, मागील पंधरवाड्यात जामनेर तालुक्यात मुसळधार पाउस झाला.