Sant Santaji Maharaj Jagnade अकोला जिल्हा श्री संत संताजी महाराज पुण्यतिथी निमित्त सर्व शाखीय तेली समाजाची शोभायात्रा. तेली समाज बांधवांना विनंती करण्यात आली आहे की, तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अकोला जिल्हा कार्यकारिणी वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
संत श्री संताजी महाराज जगनाडे महासंघ, मुंबई (रजि.) न्यु हनुमान थिएटर मंगल कार्यालय, चिवडा गल्ली, लालबाग, मुंबई - ४०००१२. मुंबईत नेत्रसुख देणाऱ्या पाडुरंग पालखी सोहळयात हजारो वारकऱ्याच्या शिस्तबध्द वारित उपस्थित राहून नेत्रसुखद दर्शनाचा लाभ घेऊन जगतगुरू तुकाराम महाराजांचे अंतकरणातून आलेल्या पाडुरंगावरील अभंग गाथेच्या प्रत्येक शब्दाचे संकलन (नोंद) करण्याचे अनमोल कार्य केलेले आपले समाज श्रध्दास्थान संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज
वरवेली तेली समाज - तेली समाजोन्नती संघ तालुका चिपळूण व गुहागर संघाच्या वतीने तेली समजातील उद्योजकांसाठी मार्गदर्शन शिबीर बांधवांसाठी उद्योग व व्यापार मार्गदर्शन) दि. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वा. भगवती बॅकचेटस शंग्रीला कंपनीसमोर हॉटेल गोपालाजच्या मागे एल. बी. एस. मार्ग भांडुप (प) मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. तेली समाजातील काही यशस्वी उद्योजक आणि व्यापारी तसेच लघु उद्योग मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत.
गेवराई तेली समाज :- संताजी जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या एकूण १४ टाळकांपैकी एक महत्त्वाचे टाळकरी होते. त्यांनी निरपेक्ष वृत्तीने व निस्सीम भक्तीने संत तुकाराम महाराज यांचे अभंग लिहून ठेवण्याचे व जतन करण्याचे महान कार्य केले.संघर्षाच्या काळात संताजी जगनाडे यांनी जगद्गुरु तुकोबाराय यांना साथ दिली.एव्हडे त्या दोघांत सख्य होते,असे प्रतिपादन प्रसिद्ध अभ्यासक विजय गवळी यांनी गेवराई येथे केले.
राज्यस्तरिय लिंगायत तेली समाज विधवा विधूर घटस्फोटीत व अपंग वधूवर पालक परिचय व स्नेह मेळावा तसेच समाजाचा विकासात्मक दृष्टीकोन विचारात घेवून समाजातील लोकांना संघटीत करून समाजाचे प्रश्न व अडचणी सोडवणेचे दृष्टीने समाज स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.