Sant Santaji Maharaj Jagnade तेली समाजातील गुणवंतांचा गुणगौरव आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करा
अमरावती : मी गुणवत्ता यादीत आलो, याची हवा डोक्यात जावू न देता विद्या विनयन शोभते या तत्त्वानुसार जगा, आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी व्हावा यासाठी प्रत्येकाने आपल्या ज्ञानाचा प्रसार व प्रचार करावा असे आवाहन माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी केले.
इवलासा वेल लाविला...... आज थोडे मागे वळून पाहिले.... तर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे बघता बघता दोन वर्षं झाली... आमच्या अहमदनगरच्या ...आदर्श असा म्हणण्यास लावणारा हा वधू वर मेळावा पाहता पाहता तिसऱ्या वर्षात सुद्धा तितक्याच उत्साहाने यशस्वीपणे साजरा झाला. दिनांक १ डिसेंबर २०१९ रविवार रोजी झालेल्या या मंगल दिनी, ऐतिहासिक दिनी अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज, संताजी विचारमंच अहमदनगर याच बरोबर सर्व समाज बंधू-भगिनी यांच्यावतीने आयोजित.... भव्यदिव्य वधू-वर पालक परिचय मेळावा
सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ, सातारा राज्यस्तरीय तेली समाज वधु वर पालक परिचय मेळावा, दिनांक 9 फेब्रुवारी 2020, वेळ सकाळी 10.25 ते 6.30 पर्यंत ठिकाण महासैनिक लॉन मल्टीपर्पज, हॉल, जुना पुणे बेंगलोर रोड, करंजे नाका, सातारा
वाई तेली समाज आयोजित श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा रविवार, दिनांक २९/१२/२०१९ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी निमित्त खालील कार्यक्रम आयोजित केले आहे. १.मूर्तीपुजा १०.३० वा. २. विद्यार्थी गुणगौरव ११.०० वा. ३.श्री संताजी महाराज यांचे जीवन चरित्र (टीव्ही सिरिअल प्रक्षेपण) १२.०० वा. ४. मान्यवरांचे मनोगत १.०० वा. ५. महाप्रसाद १.३० वा. तरी सर्व समाज बांधवांनी सहकुटुंब उपस्थित रहावे आशी विनंती करण्यात आलेली आहे.
इंदोरी, ता. २६ : दरवर्षी श्रीक्षेत्र सुदुंबरे येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्सव सोहळ्याचे जोरदार नियोजन सुरू आहे. या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. यंदा समितीचे अध्यक्ष म्हणून इंदोरीचे उद्योजक जयंत सूर्यकांत राऊत यांची एकमताने निवड केली. श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्थेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड केली.