इवलासा वेल लाविला...... आज थोडे मागे वळून पाहिले.... तर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे बघता बघता दोन वर्षं झाली... आमच्या अहमदनगरच्या ...आदर्श असा म्हणण्यास लावणारा हा वधू वर मेळावा पाहता पाहता तिसऱ्या वर्षात सुद्धा तितक्याच उत्साहाने यशस्वीपणे साजरा झाला. दिनांक १ डिसेंबर २०१९ रविवार रोजी झालेल्या या मंगल दिनी, ऐतिहासिक दिनी अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज, संताजी विचारमंच अहमदनगर याच बरोबर सर्व समाज बंधू-भगिनी यांच्यावतीने आयोजित.... भव्यदिव्य वधू-वर पालक परिचय मेळावा
सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ, सातारा राज्यस्तरीय तेली समाज वधु वर पालक परिचय मेळावा, दिनांक 9 फेब्रुवारी 2020, वेळ सकाळी 10.25 ते 6.30 पर्यंत ठिकाण महासैनिक लॉन मल्टीपर्पज, हॉल, जुना पुणे बेंगलोर रोड, करंजे नाका, सातारा
वाई तेली समाज आयोजित श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा रविवार, दिनांक २९/१२/२०१९ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी निमित्त खालील कार्यक्रम आयोजित केले आहे. १.मूर्तीपुजा १०.३० वा. २. विद्यार्थी गुणगौरव ११.०० वा. ३.श्री संताजी महाराज यांचे जीवन चरित्र (टीव्ही सिरिअल प्रक्षेपण) १२.०० वा. ४. मान्यवरांचे मनोगत १.०० वा. ५. महाप्रसाद १.३० वा. तरी सर्व समाज बांधवांनी सहकुटुंब उपस्थित रहावे आशी विनंती करण्यात आलेली आहे.
इंदोरी, ता. २६ : दरवर्षी श्रीक्षेत्र सुदुंबरे येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्सव सोहळ्याचे जोरदार नियोजन सुरू आहे. या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. यंदा समितीचे अध्यक्ष म्हणून इंदोरीचे उद्योजक जयंत सूर्यकांत राऊत यांची एकमताने निवड केली. श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्थेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड केली.
औरंगाबाद - जगतगुरू तुकाराम महाराज यांचे गाथा लेखक व तेली समाजाचे दैवत संतश्री जगनाडे महाराज यांची पुण्यथिती समाजबांधवानी घरोघरी साजरी करावी. जेणेकरून एकोपा निर्माण होऊन आपलेपणेची भावना निर्माण होईल. न्यू जयश्री अँडव्हर्टायझिंग एजन्सीचे संचालक राजेंद्र होळीवाले यांच्या ठाकरे नगर N-2 सिडको येथील निवास्थानी अभिवादन सभेचे आयोजन होते.