शिंगवे - राहाता तालुक्यातील शिंगवे येथे तेली समाजाच्या वतीने शिंगवे ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांना राष्ट्रसंत संत संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा भेट देऊन निवेदन देण्यात आले.
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे, श्री क्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ जि. पुणे. मार्गशीर्ष वद्य सप्तमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी दि. 18 डिसेंबर 2019 ते 25 डिसेंबर 2019. अखंड हरिनाम सप्ताह
तेली समाज नांदेड - नांदेड लोकशाशन नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुका येथे तेली समाजाचे आराध्य दैवत तेली समाजाचे कैवारू संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटाने उत्सव साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित. मान्यवर बालाजीराव बनसोडे, तेली समाज जिल्हाध्यक्ष लक्ष्मण क्षीरसागर, जिल्हा सचिव गणेशराव सूर्यवंशी कोषाध्यक्ष नागनाथ चीटकुलवार,
तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त बुधवार दि. १८ डिसेंबर २०१९, सकाळी १० ते २ पर्यंत, नंदीकेश्वर संस्थान, नंदीपेठ, आकोट या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी समाजातील महिलांचे सशक्तीकरण या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान तसेच तेली समाजातील उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आलेला आहे.
संगमेश्वर तेली समाज सेवा संघ, संगमेश्वर तालुक्याच्या वतीने, रविवार दि. १५ डिसेंबर २०१९ रोजी, सकाळी १०.०० वा. संगमेश्वर तालुका तेली समाज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये तेली ज्ञाती समाजाच्या तालुका नुतन दिनदर्शिकेचे प्रकाशन व वितरण आणि महिला हळदीकुंकू होणार आहे. तरी सर्व समाज बांधवानी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा ही विनंती करण्यात आलेली आहे.