Sant Santaji Maharaj Jagnade कुंभारात गोरोबा व एकोबा, माळ्यांत सावता, सोनारात नरहरी वगैरे इतर जातीमध्ये असे अनेक भगवद्भक्त होऊन गेले. त्याचप्रमाणे तेराव्या शतकात नामदेवाचे समकालीन असे तेली ज्ञातीत "जोगा परमानंद'' हे भगवद्भक्त होऊन गेले. हा महापुरुष बहुतेक सर्व संतमालिकेत उल्लेखिलेला आहे. कारण हे तेराव्या शतकांत मोठे साधू व बऱ्याच वरच्या दर्जाचे कवी म्हणून प्रसिद्ध होते.
कै. विजय पांडुरंग काळसेकर, कला फोटो स्टुडीयोचे संस्थापक. फोटोग्राफी व्यवसायातील एक नावाजलेले रत्न
कणकवलीत तेली समाज संघटीत करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात कै. बापू डिचोलकर, कै. वसंत आरोलकर व त्यांची पत्नी, श्री. बबन नेरकर, श्री. नंदकुमार आरोलकर व तेलीआळीतील समाज बांधवांना मोलाचे सहकार्य करणारे समाजसंघटक अशी त्यांची ख्याती होती. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९४८ रोजी झाला. बालपणापासूनच त्याना कला-किडा क्षेत्राची आवड होती. शालेय जिवनात उत्तम धावपटू व व्हॉलीबॉल पटू अशी ओळख त्यांनी निर्माण केली.
सासवड येथील कावडे घराण्यास मानाने वागविले जाते. त्याच्या घराण्यातील मुळपुरुष भुत्या तेली' हा शंकराचा भक्त होता, घरातील मोठ्या मुलास 'बुवा' म्हणतात. त्याचे अंगावर सदैव काव लावून भगवी केलेली वस्त्रे असतात, यांचेजवळ तांब्याचे दोन मोठे रांजण बसविलेली शिडाची कावड असते. पुढील भागी महादेवाची पिंडी व नंदी असतो.
नागपूर जिल्ह्यात तेली समाज मोठ्या प्रमाणात आहे. असे असूनही आम्हाला आमच्या संख्या बळाच्या तुलनेत लाभ मिळत नाहीत. जातीनिहाय जनगणनाच झाली नसल्याने शासनाला धोरण ठरविण्यातही अनेक अडचणी जातात. त्यामुळे जातीनिहाय जनगणना करावी, अशी आग्रही मागणी तेली समाज बांधवांनी केली. तेली समाजाची वाटचाल, समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्या, यशोगाथा यासह सांस्कृतिक महत्त्व आदी मुद्यांवर मंथन झाले.
संताजींचा जन्म एका तेली कुटुंबात मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला पुणे जिल्ह्यातील चाकण येथे झाला. संतांजीच्या आजोबांचे नाव भिवाजी व वडिलांचे नाव विठोजी. विठोजीचा विवाह सुदुंबरे येथील मथाबाई काळे यांच्याशी झाला. संताजीचे वडील विठोजी दिवसभर घरात तेलाचे घाणे घेत. व्यवसाय तेलाचा होता. घाणे घेता घेता विठोबांचे नामःस्मरण करीत व रात्री देवाचे चिंतन करीत. असे संतांजीच्या घरात धार्मिक कार्यक्रम रोज होत. पूजा नामस्मरण व संत तुकरामाचे अभंग रोज म्हटले जात. संताजीही त्यात बालवयातच सहभागी होत असत.