सासवड येथील कावडे घराण्यास मानाने वागविले जाते. त्याच्या घराण्यातील मुळपुरुष भुत्या तेली' हा शंकराचा भक्त होता, घरातील मोठ्या मुलास 'बुवा' म्हणतात. त्याचे अंगावर सदैव काव लावून भगवी केलेली वस्त्रे असतात, यांचेजवळ तांब्याचे दोन मोठे रांजण बसविलेली शिडाची कावड असते. पुढील भागी महादेवाची पिंडी व नंदी असतो.
नागपूर जिल्ह्यात तेली समाज मोठ्या प्रमाणात आहे. असे असूनही आम्हाला आमच्या संख्या बळाच्या तुलनेत लाभ मिळत नाहीत. जातीनिहाय जनगणनाच झाली नसल्याने शासनाला धोरण ठरविण्यातही अनेक अडचणी जातात. त्यामुळे जातीनिहाय जनगणना करावी, अशी आग्रही मागणी तेली समाज बांधवांनी केली. तेली समाजाची वाटचाल, समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्या, यशोगाथा यासह सांस्कृतिक महत्त्व आदी मुद्यांवर मंथन झाले.
संताजींचा जन्म एका तेली कुटुंबात मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला पुणे जिल्ह्यातील चाकण येथे झाला. संतांजीच्या आजोबांचे नाव भिवाजी व वडिलांचे नाव विठोजी. विठोजीचा विवाह सुदुंबरे येथील मथाबाई काळे यांच्याशी झाला. संताजीचे वडील विठोजी दिवसभर घरात तेलाचे घाणे घेत. व्यवसाय तेलाचा होता. घाणे घेता घेता विठोबांचे नामःस्मरण करीत व रात्री देवाचे चिंतन करीत. असे संतांजीच्या घरात धार्मिक कार्यक्रम रोज होत. पूजा नामस्मरण व संत तुकरामाचे अभंग रोज म्हटले जात. संताजीही त्यात बालवयातच सहभागी होत असत.
नागपूर : विदर्भ तेली समाज महासंघाची स्थापना २६ नोव्हेंबर १९९४ रोजी झाली. मधुकरराव वाघमारे, विजय बाभुळकर यांच्या प्रयत्नातून हे संघटन उदयास आले. समाजातील कष्टकरी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि शैक्षणिक व सामाजिक विकासाच्या हेतूने महासंघ उदयास आला. नागपुरातील महासंघाचे कार्यालय राजे रघुर्जीनगर येथे आहे. महासंघाच्या माध्यमातून संघटनात्मक पद्धतीने शासनदरबारी अनेक विषयांवर लढे उभारण्यात आले.
दौंड. ता. १ : दौंड शहरात श्री संताजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वृक्ष दिंडी काढण्यात आली. दौंड शहर व तालुका तिळवण तेली समाजाच्या वतीने वृक्ष दिंडी काढण्यात आली. याा प्रसंंगी तेली समाजातील समाजबांंधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांचा रोप देऊन सत्कार करण्यात आला.