चंद्रपूर जिल्ह्यातील समस्त तेली समाजातील विविध संघटनांचे सर्व पदाधिकारी आणि बुद्धीजिवी वर्ग, सर्व डॉक्टर, वकील, इंजिनिअर्स, प्राध्यापक, शिक्षकगण, शेतकरी बंधु, व्यवसायीक तसेच सामाजीक व राजकीय पुढारी आपणा सर्वांना २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये समाजाची दिशा ठरविण्यासाठी रविवार दिनांक २१/०७/२०१९ रोज दुपारी १२.०० वाजता स्थळ श्री संताजी वसतीगृह, मुल रोड, चंद्रपूरला आमंत्रित करीत आहोत.
महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेच्यावतीने कन्या दिवस साजरा
पंढरपूर : महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा पंढरपूर शहराध्यक्ष मधुकर फलटणकर, शहर कार्याध्यक्ष सागर पडगळ यांच्यावतीने दि. २१ जुलै रोजी जागतिक कन्या दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहीद कुणालगीर गोगावी अंध, अपंग निवासी शाळेमध्ये मुलांना कार्ड पेपर व मिष्टान्न भोजन देण्यात आले.
तेली समाजातील महान विभुती (भाग 7) -
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार पन्हाळा किल्ला पेशवाईत ओस पडला. गडावर नवनाथांपैकी गहिनाथांनी काही दिवस वास्तव्य केले. ते ठिकाणही ओस पडले. एके दिवशी गहिनीनाथांनी त्यांचे शिष्य विश्वनाथ फल्ले यांच्या स्वप्नात येऊन त्यांना गडावर जाण्याची आज्ञा दिली.
तेली समाजातील महान विभुती (भाग 4) -
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
सातारा जिल्ह्यातील आरफळ गावी राऊत घराण्यात काळोजी महाराजांचा जन्म झाला. एके दिवशी ते घराबाहेर पडले आणि जरंडेश्वराच्या डोंगरावर जाऊन मारूतीची उपासना करू लागले. झाडपाला खाऊ न त्यांनी 12 वर्षे उपासना केली. आश्चर्य म्हणजे या काळात महाराजांना 3 इंच लांबीचे पुच्छ फुटले.
तेली समाजातील महान विभुती (भाग 3) -
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
खान्देशातील शेंदुर्णी येथे नाटूबाई आणि मुरडाजीबाबा या दांपत्याच्या पोटी कडोबा हे एकविसावे पुत्ररत्न जन्मले. बोलता यायला लागल्यापासून या मुलाने नाम जपायला सुरूवात केली. थोडा मोठा झाल्यावर कोणत्याच कामात त्याचं लक्ष नसे. कधी कधी करडई न घालताच तासनतास रिकामा घाणा चालविला जाई आणि अकारण बैलाला त्रास दिल्याबद्दल बोलणी खावी लागत. एके दिवशी असाच रिकामा घाणा चालताना पाहून मुरडाजींनी त्यांना भरपूर मार दिला.