Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाजातील महान विभुती (भाग 3) -
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
खान्देशातील शेंदुर्णी येथे नाटूबाई आणि मुरडाजीबाबा या दांपत्याच्या पोटी कडोबा हे एकविसावे पुत्ररत्न जन्मले. बोलता यायला लागल्यापासून या मुलाने नाम जपायला सुरूवात केली. थोडा मोठा झाल्यावर कोणत्याच कामात त्याचं लक्ष नसे. कधी कधी करडई न घालताच तासनतास रिकामा घाणा चालविला जाई आणि अकारण बैलाला त्रास दिल्याबद्दल बोलणी खावी लागत. एके दिवशी असाच रिकामा घाणा चालताना पाहून मुरडाजींनी त्यांना भरपूर मार दिला.
रविवार दि.७ जुलै २०१९ पुणे जिल्ह्यातील नंदनवन समजल्या जाणाऱ्या छोटे काश्मीर म्हणून एक आगळी वेगळी ओळख निर्माण करणारा मावळ तालुका येथील तळेगाव दाभाडे मधील गजबजलेल्या वस्तीतील नाना नानी पार्क सभागृहात मावळ तालुका तैलिक महासभेच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला.
तडित जैसी कडाडे ताई तेलीण
लेखक - सुकलाल नथू चौधरी
तेलियांचे सुपूत्र - कन्या म्हणून या भारत देशात अनेकांनी अनेक क्षेत्रात आपले योगदान देऊन समाजसेवा केलेली आहेत. कोणतीही प्रसिध्दी किंवा कर्मफळाची आस न धरता निरलस सहकार्य करत राहाणारर्या सर्वच कार्यश्रेष्ठांची माहिती आज उपलब्ध नाही. जी उपलब्ध आहे, त्यांची नावंही काळाच्या पडद्यावर पुसटशी व्हायला लागलेली आहे. आज त्यांची नोंद ठळक करणं आवश्यक आहे.
तेली समाजातील महान विभुती (भाग 1) सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
जोगा परमानंद
संत नामदेवांचे गुरू म्हणुन प्रसिद्ध असलेले महापुरूष भाई जोगा परमानंद. हे तेली ज्ञातीतील होते. संत नामदेवांच्याआधी त्यांनी उत्तर भारताचा दौरा केला होता. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिब या धर्मग्रंथात त्यांच्याही काही रचनांचा समावेश आहे. जोगा परमानंद हे अतिशय उच्च दर्जाचे कवी होते.
तालुका मौदा स्नेही सोशल फोरमचे पाचवे वार्षिक स्नेह संमेलन व कोजागिरी कार्यक्रम प्रगती सभागृह वर्धा रोड नागपूर येथे नुकताच पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणून आमदार रामदास आंबटकर, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, जवाहर विद्यार्थी गृह अध्यक्ष रमेश गिरडे, नगराध्यक्ष स्मृती इखार, स्नेही सोशल फोरमचे अध्यक्ष शंकर लांजेवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ए. जी. भोळे, महामेट्रोचे महाव्यवस्थापक सुधाकर उराडे,