Sant Santaji Maharaj Jagnade नांदेड प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी नांदेड तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सत्कार सोहळ्याचे व रक्तदान शिबिराचे आयोजन नांदेड तेली समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने येथील कुसुम सभागृहात करण्यात आले आहे.
अंध विकास संस्थेस धान्यासह गणवेश द्यावा : श्रीविठ्ठल मंदिर समितीकडे मागणी
पंढरपूर - श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून येथील अंध विकास संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी धान्य व गणवेश मिळावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेकडून मंदिर समितीला देण्यात आले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, ठाणे विभाग व कल्याण तेली समाज,कल्याण (प.) तर्फे मा.नामदार श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा जाहीर सत्कार
कल्याण - तेली समाजाचे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली २०२०-२०३५ या स्वर्णिमकाळात भारत हा जगातील तिसरी महासत्ता असेल..व त्यासाठी तेली समाजाने आपल्या पाल्यांना सुशिक्षित, सुसंस्कारीत मुले घडविणे हीच काळाची गरज आहे..!-मा.श्री चंद्रशेखरजी बावनकुळेसाहेब,उर्जा व उत्पादनशुल्क मंत्री (महा.राज्य)
धुळे राज्य शासनाने नुकताच सरकारी-निमसरकारी कार्यालयात श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्याचे आदेश अध्यादेशाद्वारे नुकतेच पारित केले आहेत. तसेच श्री संताजी महाराजांची यंदा ३९५ वी जयंती साजरी होणार आहे हे औचित्य साधुन दि.८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता राजवाडे बँकेजवळील गुरूशिष्य स्मारका जवळ गुरूपुत्र गिरीश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरतीचे आयोजन करण्यात आल्याचे सुभाष धर्मा जाधव यांनी काल घेतलेल्या पत्रपरिषदेत सांगितले.
तेली समाज शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रिडा मंडळ, पंचवटी श्री संताजी मित्र मंडळ, पंचवटी व रणरागिणी महिला मंडळ, पंचवटी तैलीक महासभा, पचंवटी द्वारा आयोजित संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती समारोह. कार्यक्रमाचे ठिकाण : सिनर्जी हॉस्पिटल जबळ, गिता नगर, म्हसरुळ, पंचवटी, नाशिक दिनांक : रविवार ८ डिसेंबर २०१९