Sant Santaji Maharaj Jagnade
वरवेली - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अध्यक्ष रामदास तडस, महासचिव भूषण कर्डिले, गजानन शेलार यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मुंबई विभाग अध्यक्ष विलास त्रिंबककर यांच्या आदेशाने तरूण, तडफदार व सामाजिक कार्यकर्ते प्रविण विजय रहाटे (गुहागर) यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मुंबई युवाध्यक्षपदी निवड झाली.
भंडारा प्रांतिक तेली युवा आघाडीची जिल्हा बैठक
भंडारा : प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडीची भंडारा जिल्हा आढावा बैठक येथे पार पडली. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे कोषाध्यक्ष कृष्णराव हिंगणकर होते.
नांदेड प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी नांदेड तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सत्कार सोहळ्याचे व रक्तदान शिबिराचे आयोजन नांदेड तेली समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने येथील कुसुम सभागृहात करण्यात आले आहे.
अंध विकास संस्थेस धान्यासह गणवेश द्यावा : श्रीविठ्ठल मंदिर समितीकडे मागणी
पंढरपूर - श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून येथील अंध विकास संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी धान्य व गणवेश मिळावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेकडून मंदिर समितीला देण्यात आले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, ठाणे विभाग व कल्याण तेली समाज,कल्याण (प.) तर्फे मा.नामदार श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा जाहीर सत्कार
कल्याण - तेली समाजाचे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली २०२०-२०३५ या स्वर्णिमकाळात भारत हा जगातील तिसरी महासत्ता असेल..व त्यासाठी तेली समाजाने आपल्या पाल्यांना सुशिक्षित, सुसंस्कारीत मुले घडविणे हीच काळाची गरज आहे..!-मा.श्री चंद्रशेखरजी बावनकुळेसाहेब,उर्जा व उत्पादनशुल्क मंत्री (महा.राज्य)