औरंगाबाद - तिळवण तेली समाज जनगणना अभियानास शहर तसेच जिल्ह्यात समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अभियान राबवणारे कार्यकर्ते माहिती संकलन करण्यासाठी घरोघरी भेटी देत आहेत. जनगणनेचे अभियान अंतिम टण्यात सुरू आहे. तसेच समाजाच्या माहितीपुस्तिका तयार करण्याचे कामदेखील सुरू आहे. याबाबत माहिती संकलन करण्याची अंतिम मुदत १० डिसेंबरपर्यंत आहे.
नसरापूर : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद बाळासाहेब देशमाने यांची श्री संताजी महाराज जगनाडे तेली समाज संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष जनार्दन जगनाडे यांनी देशमाने यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले. देशमाने यांनी जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून तेली समाजाच्या उन्नतीसाठी काम केले आहे. समाजाच्या प्रश्नासाठी शासनदरबारी वारंवार पाठपुरावा केला आहे.
रत्नागिरी आबलोली :महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा राज्य कार्यकारिणीची राज्यस्तरीय बैठक नागपूर येथे राज्याध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे महासचिव डॉ. भूषण कर्डीले, कोषाध्यक्ष गजानन शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. बैठकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ३०० पदाधिकारी उपस्थित होते.
बारा बंगला, कोपरी, ठाणे (पुर्व) येथील चौकास तेली समाजाचे दैवत संत श्री. संताजी महाराज जगनाडे याचे नांव
बारा बंगला, कोपरी, ठाणे (पुर्व) येथील मध्यवर्ती टेलीफोन टॉवरखालील चौकाचे "संत श्री. संताजी महाराज जगनाडे चौक" असे नामकरण करण्यात आले आहे. ठाणे महानगर पालिकेच्या महासभेत सदर नामकरणाचा ठराव स्थानिक कार्यसम्राट नगरसेविका सौ. मालतीताई रमाकांत पाटील यांनी मांडला व मंजुर करुन घेतला.
बीडच्या माजी खासदार केशरकाकु सोनाजीराव क्षीरसागर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त जय संताजी युवा मंच, तेली समाज औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी नगरसेवक भाऊसाहेब जगताप होते. राधाकिसन सिदलंबे, विश्वनाथ गवळी, कृष्णा ठोंबरे, साई शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ सुरडकर यांनी केले.