श्री. संताजी प्रतिष्ठाण कोथरूड आयोजित मोफत वधू वर पालक परिचय मेळावा नुकताच सृष्टी गार्डन म्हात्रे पुलाजवळ एरंडवणे, पुणे - 411 004 येथे पार पडला या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील, कानाकोपर्यातून आणि ग्रामीण भागातून अनेक वधु-वर या ठिकाणी आले होते. एकुण 1700 वधु वर आणि साडेतीन हजार समाज बांधव असे एकुण पाच हजार समाजबांधवांनी या मेळाण्याचा लाभ घेतला.
तेली समाजातील आदर्श समाजरत्न रोहीदास चंद्रकांत उबाळे वाघोली, पुणे या शहर तिळवण तेली समाजातील आधुनिक विचारसरणी असलेले दानशुर युवा नेतृत्व, केवळ समाजातीलच नव्हे, तर जात-पात, धर्म असा भेदभाव नकरता गरजुंच्या मदतीसाठी स्वतः होऊन धावणारा कार्यकर्ता आशी ओळख असणारे हे थोर व्यक्तिमत्व आपल्याकडे जे आहे. ते परमेश्वराच्या कृपेन आहे. त्याचा इतरांना देखील उपयोग झाला पाहिजे
वर्धा - परावा झालेल्या वर्धा येथील विधान सभेच्या चुरसीच्या निवडणूकीत मा. आ. रामदासजी भगवानदसजी अंबटकर हे विजयी झालेत. विदर्भात भाजपाने 4 थे आमदार तेली समाज बांधव केलेत. या साठी खा. रामदासजी तडस यांनी परिश्रम घेतले. त्या बद्दल दोघांचे आभार.
एरंडेल तेली समाज ब्रम्हपुरी - आजच्या एकविसाव्या शतकातील आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपला तेली समाज सर्व स्तरांमध्ये मागे पडल्याचे दिसून येत आहे. शिक्षणाचा अभाव शेतीत येणाऱ्या उत्पादन व सर्वस्तरीय वाढदिवस गरिबी इत्यादी समस्या समाजाच्या प्रगतीत मारक ठरत आहे. मुळ समस्यांच्या निवारणार्थ समाज ब्रम्हपुरी द्वारे रोजगार मार्गदर्शन शिबीरााचे आयोजन दिनांक 10/06/2018 रोजी करण्यात आलेले आहे.
धुळे : सोशल मिडीयाचा वापर अलीकडे वाढल्यामुळे प्रत्येकजण अनेक व्हॉटस्अॅप ग्रुपशी जोडलेला आहे. परंतु, अनेक ग्रुपमधील संदेश हे ब-याचदा निरुपयोगी असतात. त्यामुळे हे ग्रुप असून नसल्यासारखे किंवा निव्वळ 'टाईमपास' ठरतात. परंतु, दोंडाईचा येथील प्रकाश चौधरी यांनी व्हॉटसअॅप ग्रुपचा विधायक वापर करत समाजबांधवांना एकत्र करण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत त्यांनी या ग्रुपमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेशातील एकूण २०८ गावे जोडली आहेत. विशेष म्हणजे या ग्रुपचा वापर ‘टाईमपास' म्हणून होणार नाही, यासाठी कठोर नियमही तयार केले आहेत.