Sant Santaji Maharaj Jagnade
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे "ह.भ.प. कै.विश्वनाथ आप्पा तेली समाज संघटना तेर" यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या वैकुंठ धाम रथाची पुजा तेली समाजाचे जिल्हाअध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथिल तेली समाज बांधवाच्या वतीने ह.भ.प. कै.विश्वनाथ आप्पा तेली समाज सेवाभावी संघटना शाखा तेर यांच्या वतीने वैकुंठ धाम रथाची पुजा उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे जिल्हाअध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांच्या हस्ते पुजा करण्यात आली.
सर्व तेली समाज बंधु - भगिनींना नम्र निवेदन करण्यात आलेले आहे की दि. ३० सप्टे. २०१८ रविवार ला विदर्भ तेली समाज महासंघ, नागपूर संघटनेचे अधिवेशन आयोजीत केले आहे. वेळ : रविवार, दि. ३० सप्टेबर २०१८ ला दू. १२:०० वा. स्थळ : सेवादल महिला महाविद्यालय, सक्करदरा चौक, उमरेड रोड नागपूर या अधिवेशनाला विदर्भातील विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी व नागपूर महानगरातील बंधु-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होत आहे.
श्री संताजी तेली समाज संस्था हडपसर ह्या तेली समाज संस्थेचा वर्धापन दिन भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. म्हणून तर विद्यार्थ्यांना बक्षीस प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती संस्थापक श्री शामराव भगत अध्यक्ष श्री अजित दळवी श्री उपअध्यक्ष प्रितम शेठ केदारी कार्याध्यक्ष श्री आशोक सोनवणे सचिव श्री मोहन चिंचकर
औरंगाबाद - प्रतिनिधी, गणेश उत्सवच्या माध्मातून सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते, या निमीत्ताने विचारांची देवाण घेवाण होती, व एकमेकांचा परिचय होऊन समाज संघटनेला गती मिळते, मराठा समाज, धनगर समाज, मुस्लिम समाज, वंजारी समाज, सर्वच जातींचे लोक आप आपल्या माणसां साठी आप आपल्या जातींसाठी एकत्र येत आहे,आता तेली समाजाने ही संघटीत होणे ही काळाची गरज आहे
औरंगाबाद : तेली सेनेच्या वतीने जगनाडे महाराज आयटी पार्कमध्ये तेली समाजातील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. आयटी पार्कचे अध्यक्ष विश्वनाथ गवळी यांनी प्रास्ताविक केले. कृष्णा ठोंबरे अध्यक्षस्थानी होते. हभप बापूराव सोनवणे, भगवान बागूल, विजय गवळी, डॉ.उज्वल करवंदे, सुनीता मचाले, बबिता राऊत यांनी विचार मांडले.