Sant Santaji Maharaj Jagnade
तिळवण तेली समाज विद्यार्थी गुणगौरव समारंभ 15 ऑगस्ट 2018 रोजी संपन्न होत आहे. सन. 2017 - 2018 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण इयत्ता 8 वी ते 12 वी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. बक्षीस वितरण समारंभ 15 ऑगस्ट 2018 रोजी सायंकाळी 4 त 7 वा. या वेळेत होईल.
सातारा शहर समस्त तेली समाज सातारा, यांचे वतिने सोमवार दि. 4/6/2018 रोजी. स्थळ - संगममाहुली सातारा येथे अधिक मासाचे काळा निमित्त श्री गंगापूजन व महाप्रसाद करण्यात येणाार आहे. कार्यक्रम सकाळी 9.30 ते11.30 गंगा पूजन विधी दुपारी 12.30 ते 2.30 महाप्रसाद, आयोजक सातारा शहर समस्त तेली समाज सातारा.
दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी गुणांपेक्षा गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करावे. आजचा विद्यार्थी कोणतेही शिक्षण घेत असला, तर विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मोठा अधिकारी झाला, तर त्याचा गौरव करण्यात मला आनंद होईल. विद्यार्थी शिक्षणासोबतच राजकीय व सामाजिक घडामोडींचे ज्ञान ठेवून त्यातही करिअर करावे, असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी केले.
अकोला येथे तेली समाज युवक संघ च्या वतीने स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते सर्व नगरसेवक शशिभाऊ चोपडे नितीनभाऊ झापर्डे तुषारभाऊ भिरड सौ किरण ताई बोराखडे अभय भाऊ बिजवे सर्व तेली समाज युवक संघाचे कार्यकर्ते व समाज बाधंव मोठ्या संख्येने उपस्थित हाेते. तेली समाजातील नवयुवकांंनी स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.
दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी अमरावती तेली समाजा तर्फे शैक्षणिक व क्रिडा क्षेत्रातत प्राविण्यप्राप्त केलेल्या व स्पर्धा परिक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा अमरावी जिल्हा तैलिक समिती च्या वतीने रविवार दि. 29 जुलै 2018 रोजी सकाळी 11.30 वाजता टाऊन हॉल, नेहरू मैदान, राजकमल चौक, अमरावती येथे आयोजीत करण्यात आलेला आहे.